पान:रामायणनिरीक्षण.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिवाय. आहे. पुस्तकाची किंमत १॥ रुपाया असून तें ( नं. २०४ सदा- शिव पेठ, पुणे शहर या पत्त्यावर ) ग्रंथकर्त्याकडे मिळतें. ज्ञानप्रकाश, ता. २४ सप्टेंबर सन १९१२. भारतीय रसायनशास्त्रः - हें पुस्तक वैद्य त्र्यंबक गुरुनाथ काळे यांचेकडून आले आहे. रसशास्त्रासंबंधाची माहिती कोणकोणत्या संस्कृत व प्राकृत ग्रंथांत आढळते, याबद्दलची या पुस्तकांत माहिती दिली आहे. पुस्तकाची किंमत १॥ रुपया असून ते ( नं. २०४, सदाशिव पेठ, पुणे शहर, येथे ) ग्रंथकर्त्याकडे मिळेल. ज्ञानप्रकाश, १९-३-१९१३ भारतीय रसायनशास्त्र- " पुराणशोधक- ग्रंथमालॅपैकी आपलें दुसरे पुस्तक काल मिळाले; तें सबंध वाचीतोपर्यंत खाली ठेववलें नाहीं. शोधकता व मार्मिकता फार उत्तम आहेत. आपले महाराष्ट्रावर व एकंदर वाङ्मयावर फार उपकार आहेत. नवनाथचरित्र, अ. २३मध्ये अखेर अखेर गोरक्षांचा (?) मच्छेद्राचा समाधीचा शक १००० असा उल्लेख नरहरी मारूंनी केलेला आहे; हा विचार करण्यासारखा आहे. आपले प्रयत्न असेच संतत सफल होऊन मराठी वाङ्मयांत अत्युत्कृष्ट ग्रंथांची भर पडो, अशी १ यावरी त्या वस्तीस । यसते झाले बहुत दिवस | शके दहाशे वर्षास | समाधी त्यांनी घेतल्या ॥ ७३ ॥ अ. २३, नवनाथभक्तिसार. यांत मत्स्येंद्रादि नाथांचा समाधिशक शके १००० दिलेला महत्त्वाचा आहे. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ-निवृत्तिनाथ व ज्ञानेश्वर यांतील ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, याह- टोनें पहतां मत्स्येंद्रादिकांचा समाधिकाळ शके १००० दाहि उल्लेख बरो- र महत्त्वाचाच आहे. यानें परस्परढीकरण होते. ( त्र्यं. गु. काळे )