पान:रामायणनिरीक्षण.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिप्राय. तरी तिची छाननी तज्ज़ विद्वानांकडून सर्व बाजूंनी होण्यापूर्वी ती कितपत ग्राह्य आहे, हे ठरविणें कठिण आहे. रा. काळे यांच्या या ग्रंथाचा पहिला भाग जितका सुव्यवस्थित आहे तितका दुसरा भाग नाही, असे म्हणणे भाग आहे. या भागांत एक नवीन उपपति विद्वानांपुढे मांडावयाची असल्यामुळे तो लिहितांना तर्कशास्त्रांतील वाक्यमाला – ( Syllogism ) जशी सुत्र्यवस्थित असते, तशा पद्ध- तीचा अंगोकार करावयास पाहिजे होता. पण तसे न करतां, निरनि- राळ्या वेळी लिहिलेले निर्बंधच या भागांत निरनिराळ्या प्रकरणांत छापल्यामनायें भात होतो. तथापि, हें कसेंहि असले तरी या भागांत- हि रा. काळे यांची सूक्ष्मदृष्टि, शोधकता व कल्पनेचा नवीनपणह ह्यांची पूर्ण प्रतीति आल्यावांचून राहत नाही. आमच्या प्राचीन चाङ्मयाचा युरोपियन चिकित्सक पद्धतीने पण स्वकीयत्वाचे दृष्टीने अभ्यास करणारे फार थोडे असून त्यांच्या शोधांचं किंवा ग्रंथाचें पाश्चात्यांमध्ये जितकें चीज व कौतुक होतें तितकं इकडे होत नाहीं, ही दुर्दैवाची गोष्ट होय. पण असल्या ग्रंथांस - नाटके-कादंन्या इतका जरी नाहीं तरी - बराच लोकाश्रय मिळाल्यावांचून आम्हां- मधील शोधऋत्रुद्वी जागृत होणें दुरापास्त आहे. या दृष्टीने रा. काळे यांचा हा ग्रंथ श्रीमान्, बहुश्रुत व विद्वान महाराष्ट्रीयांनी आश्रक देऊन संग्रह करण्यास योग्य आहे, यांत संशय नाहीं. ग्रंथांतील विषयाचे मानाने त्याची किंमत १८८ ठेवली आहे, ती गैर म्हणतां येत नाहीं. पुरागनिरीक्षगः – हें पुस्तक वैव त्र्यंबक गुरुनाथ काळे यांनीं के असून ते चित्रशाळा छारखान्यांत छापिलें आहे. या