पान:रामायणनिरीक्षण.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण, अनेक संस्कार व अखेरची भविष्य भागांची जोडणी या सर्वांचें उद्धा- टण रा. काळे यांनी या भागांत फारच सोपपत्तिक व साधार केलेले असून त्यांवरून त्यांची शोधकबुद्धी व मार्मिकता यांचा कोणासहि सहज प्रत्यय येण्यासारखा आहे. पुस्तकाचा दुसरा भाग विशेष वादग्रस्त असून त्यांतील विषयवि- - चेचनपद्धति व अखेर काढलेले अनुमान हीं अगदी नवीन आहेत. हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासांत बुद्धाचा काळ सामान्यतः निश्चित झालेला आहे. त्याचे मार्गे जाऊन पाहिले तर इतिहासांतील अति • महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे भारतीय युद्ध ही होय. हें युद्ध द्रापार .. युगाचे अंतीं झालें, म्हणजे तें सुमारें ५००० वर्षांपूर्वी झाले, अशी - सामान्य समजूत आहे. पण रा. काळे यांचें असें म्हणणे आहे कीं, अलीकडील पौराणिक व आर्यभट्टादि ज्योतिपी जें युगमान समजतात, “तें खरें नाहीं. पूर्वी पांच वर्षीचें एक युग, चार वर्षांचं एक युग, हजार ते ४००० वर्षीचें एक युग, किंबहुना वर्ष-युग, अशा अनेक भिन्न "भिन्न कल्पना असून, सांपत आपण ज्यास 'कल्यारंभ' समजतों, तो खरोखर तसा नसून 'कल्लारंभ' आहे; व भारतीयुद्ध ५००० चषापूर्वी झालं नसून इ. स. पूर्वी १२६३ चे सुमारास झालेले · आहे. आपल्या या म्हणण्याचे समर्थनार्थ रा. काळे यांनी पौराणिक वाङ्मयांतील अनेक आधार देऊन त्यांचें बरेंच सविस्तर विवेचन -केलेले आहे. रा. काळे यांनी कालानुक्रम निश्चित करण्याची ही पद्धती मार्गे पूर्वकल्पापर्यंत व पुढें आंध्रभृत्यांपर्यंत नेऊन विषयास परिपूर्णता आणली आहे. रा. काळे यांची कालानुक्रमाची ही उपपत्ति नवी असून तिचें "विवेचन जरी त्यांनीं बन्याच शोधकबुद्धीनं व मार्मिकतेनें केले आहे,