पान:रामायणनिरीक्षण.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभिमाय. (केसरी, १५ ऑक्टोबर १९९२ ) पुराण निरीक्षण हा सुमारे ३१५ पानांचा नवीन ग्रंथ महाराष्ट्रांतील प्रसिद्ध पुराणकालसंशोधक रा. रा. व्यंबक गुरुनाथ काळे यांनी लिहिला असून तो आमचेकडे येऊन बरेच दिवस झाले. या ग्रंथास जरी ' पुराणनिरीक्षण' हें एकच नांव दिलेले आहे, तरी त्यांत दोन भिन्न विषय आलेले आहेत. पहिल्या भागांत अठराहि पुराणांचें चिकित्सक बुद्धीने निरीक्षण केले असून दुसऱ्या भागांत भरतखंडाच्या पुराण इतिहासांतील गूढ व अनेक कारणांनी घोटाळ्याचा होऊन गेलेला. कालानुक्रम निश्चित करण्याचा प्रयत्न रा. काळे यांनी केलेला आहे. पुराणांत 'शिमगा' म्हणणारी एक जुनी सुशिक्षित पिढी होऊन गेली असून 'उकिरडा' म्हणून ती गादी चालविणारा एकादा चेला अजूनहि मधून मधून दृग्गोचर होतो. पण हिंदूंच्या प्राचीन वाङ्मयांत पुराणांचें स्थान व महत्त्व केवढे आहे हे लोकांस आतां पूर्णपणे पटलें आहे. या पुराणांचें अगदी प्राचीन असे निरीक्षण म्हटले तर तें नारदपुराणकर्त्याने केलेलें अ.हे. तें सोडून देऊन अर्वाचीन काळाकडे दृष्टि दिली तर पुराणांचें निरक्षण विल्सन्साहेबांनी इंग्रजीत व. पं.. ज्वालाप्रसाद यांनी हिंदीत केले असून, त्याशिवाय दरपुराणाच्या आवृत्तींच्या प्रस्तावनंत फुटकळ प्रयत्न बरेच झाले आहेत. परंतु रा काळे यांचें हें निरीक्षण सर्वोहून जास्त व्यापक, मुद्देसूद, मार्मिक व व्यवस्थित झालेले असल्यामुळे पुराणग्रंथांचें चिकित्सकदृष्टीनें परी- शीलन करणारांस पुस्तकाचा हा भाग-गाईड म्ह. अचूक मार्गदर्शका- • सारखा झाल्यावांचून राहणार नाहीं. व्यासांच्या पूर्वीचें एक पुराण,. नंतर त्यांनी केलेल्या १८ पुराणसंहिता, व त्यांत वारंवार झालेले .