पान:रामायणनिरीक्षण.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टीपा. ( १ ) रा. केतकर यांनीं, शनीकडोन रोहिणशिकटभेद केव्हां होऊं शकेल याविषयीं गणित करून असें सांगितलें कीं, शकापूर्वी १२०० ते ४२०० वर्षेपर्यंत शनीकडून रोहिणीशकटभेद होऊ शकेल; त्याहून पूर्वी आणखी ३ - ३॥ हजार वर्षेही, म्हणजे शकापूर्वी सुमार ७००० वर्षेपर्यंतही रोहिणीशकटभेद शनीकडून होऊ शकेल सारांश, एकवेळीं सुमारें ६ |७ हजार वर्षेपर्यंत रोहिणीशकटभेद निरंतर तीसतीस वर्षांनी एकदां शनीच्या कक्षेत होत असतो. शनीचा क्रांतिवृताशीं संपात ५१ अंश सरकण्याला सुमारे १० हजार वर्षे लाग- तात; त्या मानानें पाहतां ३६ अंश तो संपात सरकण्यास सुमारें ७२००० वर्षे लागतील. म्हणजे, शनीनें शकापूर्वी ७००० वर्षी- पूर्वी आणखी एकदां केव्हां रोहिणीशकटभेद केला होता असा कोणीं प्रश्न केला तर तो शकापूर्वी ७२००० ते ७८००० वर्षो- पूर्वी केला होता, हेंच उत्तर मिळेल. सारांश, इतक्या प्राचीन काळीं आम्हीं हिंदुस्थानांत अयोध्येंत होतों, असें कांहीं कोणासहि वाटणार नाहीं. तेव्हां, रामायणकाळ शकापूर्वी ७२००० वर्षीच्या दरम्यान न येतां, अलीकडच्या रोहिणीशकटभेदाच्या वेळींच येईल व आला पाहिजे हैं उघडच आहे. तो काळ म्हणजे शकापूर्वी १२०० ते ७००० पर्यंतचा काळ होय ! त्यांतल्या त्यांत रामायणांत युद्धकांडांत असा उल्लेख असल्यामुळे रामायणकाळी रोहिणीशकटभेद होत असे हेंहि सिद्ध होतें:—— ते ७८००० .