पान:रामायणनिरीक्षण.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. यावरून प्राचीन काळच्या गोष्टींना हजार वर्षांचें एक वर्ष हें मान कांहीं लेखकांनी लाविलें होतें, हें सिद्धच होतें. विश्वामित्र व उत्तर- कांडांतील ब्राह्मणपुत्र यांच्याविषयीं तर इतर ठिकाणचे स्पष्ट उल्ले- खच आम्हांस दाखवितां आले. त्यांवरून, दशरथास देखील ६० वर्षांच्या वयांत मुले झाली असावीं, व रामांनीं निजधामापर्यंत ११ वर्षे राज्य केलें असावें, असेंच म्हणावें लागतें. असो. २०४