पान:रामायणनिरीक्षण.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिररीक्षण. जग्राह तरसा सीतां ग्रहः खे रोहिणीमिव || युद्धकांड, १२९ - २६ रावणानें सीतेला कसें पकडलें हें सांगतेवेळी हें वाक्य आले आहे. यांतील 'ग्रह' यावरून शनीच असावा असे वाटतें. रावण या राक्ष- साला कवी शनीचीच उपमा देणार हैं साहजिक दिसतें. यावरून शनिस्तोत्रांत जें रोहिणीशकट भेद झाल्याचें वर्णन आहे त्याला प्रत्यक्ष रामायणांतील या वाक्यावरूनहि पुष्टीकरण मिळतें. रा. केतकर यांच्या गणितावरून एक अंत्यत महत्त्वाची गोष्ट सिद्ध होते ती ही कीं, शकापूर्वी १२०० च्या अलीकडे केव्हांहि शनीच्या रोहिणीशकटभेदाचा काळ येणे शक्य नाहीं व त्यामुळे शकापूर्वी १२०० ते ७००० च्या पलीकडे कधीहि रामायणाचा काळ जाणे शक्य नाहीं. हलींचा काल इ. पू. ३१०२ सालीं सुरू झाला असे धरून त्या पूर्वीचा संबंध द्वापर ८६४००० वर्षांचा "गेल्यानंतर त्यामागें त्रेतायुगांत रामचंद्र होणें (म्ह. ते ८६७००० • वर्षांपूर्वी होणें ) कसें अशक्य आहे हे रा. केतकरांच्या गणितावरून कळून येतें. रामायणाचा काळ केव्हां तरी शकापूर्वी १२०० ते १७००० वर्षीपर्यंतच (म्हणजे रोहिणीचा शकटभेद शनीकडून होत असेपर्यंतच ) असला पाहिजे हें यावरून उघड होते. यापेक्षां स्पष्ट - पणे रामायणकाळ या प्रमाणावरून कळणे शक्य नाहीं. इतर प्रमा- णांनीं रामायणकाळ इ. प. २२०० ते २५०० च्या दरम्यानचा असावा हें आम्ही दाखविलेलेच आहे; व रा. ब. वैद्यहि ही गोष्ट अस्पष्टपणे कबूल करितात. ( २ ) रामचंद्रांपासून भारतकालीन सूर्यवंशीय बृहद्धलापर्यंत ( कुश - अतिथि - निषध - नल - नमस- पुंडरीक-क्षेमधन्वा - देवानीक--