पान:रामायणनिरीक्षण.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १८ वें. रामायणांतील वर्षीविषयींच्या अतिशयोक्ति. २०१ (परिशिष्ट १८ वें.) वाल्मीकानें रामायण लिहिलें तसच कांहीं तें आतां राहिलें नाहीं हैं एकदां कळल्यानंतर, त्यांत पुढील लेखकांनी कशा अतिशयोक्ति केलेल्या असाव्यात हे केव्हांच लक्षांत येईल. रामायणाला सद्यःस्वरूप इ. पू. १०० च्या सुमारास मिळाले असावें असें रा. ब. वैद्य म्हण- तात. त्या वेळींच हे अतिशयोक्तीचे प्रकार आपल्या ग्रंथांतून शिरले ●असतील; किंवा त्याहूनहि अर्वाचीन काळांतहि ते शिरले असतील. आतां रामायणांतील कांहीं अतिशयोक्तींविषयीं (विशेषेंकरून वयांच्या विषयीं ) आपण थोडासा विचार करूं. दशरथ ६० हजार वर्षीचा झाला तेव्हां त्यास रामलक्ष्मणादि पुत्र झाले; विश्वामित्रानें १० हजार वर्षे तप केलें; उत्तरकांडांत जो मुलगा मेला तो ५ हजार वर्षीचा होता; व रामाने परत अयोध्येस आल्यानंतर ११ हजार वर्षे राज्य केलें, असे अनेक उल्लेख रामायणांत आढळतात. रामाची वाढ ( यौवनापर्यंत ) जर १५ - १६ वर्षांनी पुरी होते, तर दशरथ तेवढे 10 हजार वर्षे जगूं शकतात व राम ११ हजार व राज्य शकतात, व सर्वोत आश्चर्य म्हटले म्हणजे उत्तरकांडांतील मुलगा ५ हजार वर्षांचा झाला तरी ' अप्राप्तयौवन ' च राहतो, हें आश्चर्य कारक व विरोधदर्शक नाहीं काय ? पंधरा सोळा वर्षांनी जर राम व सीता यौवनदशेस प्राप्त होतात, तर तो मुलगा मात्र ५ हजार वर्षांचा झाला तरी अप्राप्तयौवनच राहिला, असें म्हणण्यांत विसंगतता येत नाहीं काय? रा. महादेव गोविंद अभ्यंकर यांनी तर सुचविलें आहे