पान:रामायणनिरीक्षण.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० रामायणनिरीक्षण. जितस्तद्धनुषा वाणमोचनाद्राघवेण हि । एवं श्रीरामचंद्रस्य पौरुषं किं वदाम्यहम् ॥ ८० ॥ आ. रा. १४. सर्व अवतारांत रामावतारच अप्रतिम कां हें पहिल्या उतान्यांत दिलेलें आहे; राम व कृष्ण या दोन अवतारांत पुनः रामावतारच श्रेष्ठ कां, हें सापेक्षपणे दुसन्या उताऱ्यांत दाखविलेलें आहे; व श्रीरामांचें महत्त्व निरपेक्षपणें कसें सिद्ध होतें हैं तिसऱ्या उताऱ्यांत दिलेलें आहे. श्रीराम हे विष्णूचे अवतार असून राक्षसांच्या नाशा- साठी त्यांनी जन्म घेतला ही कल्पना भारतांतून तर चोहोंकडे आढळतेच, पण रामायणांत देखील ती अथपासून इतिपर्यंत ध्वनि- रूपानें आढळते. उत्तरकांडांत तर नष्टधर्मव्यवस्थेसाठी नारायण वारं- वार अवतार घेत असतो असा व त्या राक्षसांना यासाठी मारणारा राम नारायणाचाच अवतार असल्याचा उल्लेख आहे:- - ( रामास ऋषि म्हणतात ):-- ये त्वया निहतास्ते तु पौलस्त्या नाम राक्षसाः । सुमाली माल्यवान्माली ये च तेषां पुरःसराः ॥ २४ ॥ सर्व एते महाभागा रावणाहूलवत्तराः । न चान्यो राक्षसान्हंता सुरारीन्देवकंटकान् ॥ २५ ॥ ऋते नारायणं देवं शंखचक्रगदाधरम् । भवान्नारायणो देवश्चतुर्बाहुः सनातन ॥ २६ ॥ राक्षसान्हंतुमुत्पन्नो अजय्यः प्रभुरव्ययः । नष्टधर्मव्यवस्थानां काले काले प्रजाकरः ॥ २७ ॥ उत्पद्यते दस्युवधे शरणागतवत्सलः ।