पान:रामायणनिरीक्षण.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ रामायणनिरीक्षण. कीं, रामायणांतील हे सारे हजार व्यर्थ आहेत; खन्या वर्षाला सद्यः स्व- रूपकारांनी हजारांनी गुणिले आहे. ही रा. अभ्यंकरांची सूचना मला देखील पसंत दिसते; व त्या दृष्टीनें मी पूर्वीचे ग्रन्थ वाचीत असतां मला खालील निर्णायक पुरावा या बाबतींत मिळाला. ( १ ) उत्तरकांडांत मेलेला मुलगा ५ हजार वर्षीचा नसून पांचच वर्षांचा होता, असें मूळच्या वाल्मीकिरामायणांत वर्णन असलें पाहिजे, हें त्या रामायणावरून लिहिलेल्या इतर रामकथांतील उल्लेखां- वरून स्पष्टपणें कळून येतें. पद्मपुराणाच्या सृष्टिखंडांत रामायणाच्या उत्तरकांडांतील सर्व हकीकत आलेली आहे; तींत ओघांत कवि लिहितो की:- - त्वामेकपुत्रं यदहं पश्यामि निधनं गतम् । अप्राप्तयौवनं बालं पंचवर्षं गतायुषम् || पद्म पु. खंड १-३५-३७. तसेंच, आनंदरामायणांतहि याच मुलाविषयी लिहिले आहे कीं, तो पांच वर्षांचा असतां मेला:- - अथैकदा तु साकेतवासिनो भूसुरस्य च । पंचत्वं पंचवर्षीयः पुत्रः प्राप्तः शिशुः प्रियः || आ. रा. ७-१०-५०. या दोन स्वतंत्र ठिकाणच्या उल्लेखांवरून मुळच्या वाल्मीकिरामा- यणांत हा मुलगा पांच वर्षांचा असतांच मेला, असा स्पष्ट उल्लेख असावा हे उघड होतें. त्याशिवाय, वाल्मीकिरामायणावरूनच लिहि- लेलीं हीं आख्यानें असे उल्लेख करितीं ना. शिवाय, हीं यानें रामायणाला सद्य:स्वरूप मिळाल्यानंतर लिहिलीं असतीं तरीहि असे