पान:रामायणनिरीक्षण.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १२ वें.. राज्यार्थी राज्यमाप्नोति पत्तनार्थी च पत्तनम् । यो यो यद्वासनः तत्र स स प्रयतते सदा ॥ ३३ ॥ यद्यद् अभ्यस्यते लोके तन्मयेनैव भूतये । इत्याकुमारं प्राज्ञेषु दृष्ट संदेहवर्जितम् ॥ ३४ ॥ राज्यानि संपदः स्फारा: भोगो मोक्षश्च शाश्वतः । विचारकल्पवृक्षस्य फलान्येतानि राघव ।। ३५ ।। शुभवासनया युक्तः यतस्व भवभूतये | परं पौरुषमाश्रित्य विजित्येंद्रियपंचकम् ॥ ३६ ॥ या उपदेशाचा रामाच्या मनावर किती चांगला संस्कार झाल असेल बरें ? राक्षसांना मारून आर्यांना दक्षिण दिशा यथेच्छ संचारास मोकळी करून देण्यास तर हाच उपदेश कारणीभूत झाला असला पाहिजे; या उपदेशान कोणत्याहि अधिकारी पुरुषाचें मन वज्रप्राय बनून त्याच्या हातून महत्कृत्यें झाल्याखेरीज राहावयाचीं नाहीत, अशी माझी खात्री आहे. शिवाजीच्या मागें जसे समर्थ, किंवा अॅलेक्झांडरच्या मार्गे जसा अॅरिप्टॉटलू, त्याप्रमाणें श्रीराम- चंद्राच्या मागें वसिष्ठमहर्षि होते. रामचंद्राने राक्षसांच्या ताब्यांतून स्वदेश सोडवून स्वजनांस दिला; शिवाजीनेंहि मोंगलांच्या अंमलां - तून स्वदेश सोडवून स्वजनांस दिला; आणि याकाम-या सात्विक कामीं – वसिष्ठ व रामदासांचें त्यांना साहाय्य होतें. पण महत्त्वां- क्षेनें लोकांची राज्य विनाकारण हरण करणाऱ्या अॅलेक्झांडरला व त्याच्या गुरु अॅरिस्टॉटल्ला — वरील जोडीजवळ कां बसविलें, असा कोणी आक्षेप घेईल; पण जोरदार उपदेशानें ज्यांच्या हातून मह- त्त्वाचीं व शौर्याची कृत्यें घडलीं, त्यांचींच येथें नांवें आहेत. येथे वृत्तीशीं कांहीं कर्तव्य नाहीं. १९७