पान:रामायणनिरीक्षण.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ रामायणनिरीक्षण. रूप दाखविलें !!! पूर्वी याच रामायणांत रामानें हनुमानास दिव्यरूप दाखविलें आहे; आतां रामाला सीता आपले स्वरूप दाखवीत आहे ! रामांनीं सीतेचें अष्टोत्तरसहस्रनामांनीं स्तवन केले आहे. या काव्या- च्या शाक्त कर्त्याने आपल्या सर्व हौसा या रामायणांत पुन्या करून वेतल्या आहेत. यांत पोरकट प्रसंग फारच आहेत; तसेंच या श- क्तीला परमेश्वराच्याहि वर नेऊन बसविले आहे. रामाकडून सीतेला ( परमेश्वरीला) वर मागविले आहेत ! तिच्या वरानें एकदम रामाच्या सैन्याची जी दाणादाण झाली होती ती नाहींशी होऊन तें सर्व एकत्र सुखांत जमलें ( रावणाच्या वायव्यास्त्रानें तें वाताहत होऊन गेलें होतें ); मग राम परत अयोध्येस येऊन ११००० वर्षे त्यांनी निष्कंटकपणें राज्य केलें. ही सर्व कथा शतकोटिप्रविस्तर रामायणा- पैकी अद्भुतोत्तरकांडांतील आहे, असें पुनः ( स. २७ श्लो. १३ व १९ मध्यें ) ह्नटलें आहे. या अद्भुतरामायणांत विशेष महत्त्वाची अशी कांहींच माहिती नसून फक्त सीतेचें माहात्म्य मात्र फार भरलेलें आहे. या काव्याच्या कर्त्या- स भारत माहित होतें; तसेंच त्यास भगवद्गीताहि माहित होती. ग्रंथकारानें लेखनाच्या अवसानांत रामाकडून असें वदविलें आहे कीं: न मक्ता विनश्यांत मद्भक्ता वीतकल्मषाः । आदावेतत्प्रतिज्ञातं न मे भक्तः प्रणश्यति ॥ अ. रा. १३-१२. यांत, ' आधींच मी प्रतिज्ञा केली आहे कीं, ' न मे भक्तः प्रण- श्यति' असें रामरूपी विष्णूकडून कवीनें ह्मणविलें आहे. अर्थात, ती प्रतिज्ञा भगवद्गीतेतच आहे. पण, कवीनें मात्र कालव्यास