पान:रामायणनिरीक्षण.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १५ वें. १९१ ल्यामुळे मंदोदरीस अपमान वाटून तिनें हें विष ह्मणून प्राशन केलें; पण त्यायोगें तिला गर्भ राहून तो वाढू लागला ! मग कुरुक्षेत्रांत जाऊन तिनें तो गर्भ पूर्ण वाढीनंतर जमिनींत पुरून टाकिला ! पुढें जन- कास यज्ञ करीत असतां ( भूमी स्वर्णाच्या नांगरानें उकरवीत असतां ) ती मुलगी मिळाली. त्यानें तिचें पालन पोषण केलें ! नांगराच्या फाळापासून ( सीता ) उघडकीस आल्यामुळे त्या मुलीचें नांव त्यानें " सीता ' असेंच ठेविलें ! याप्रमाणेंच अद्भुतरामायणकाराने सर्वच अद्भुत प्रकार बनवून टाकिलेला आहे ! सीता याप्रमाणे मंदोदरीची व अतएव पर्यायानें रावणाची कन्या बनविली आहे ! अद्भुतरामायणच हें ! मग काय पुसावें ? 6 ( २ ) वाल्मीकीरामायणांत नसलेला रावणाचा बंधु सहस्रवदन रावण पुष्कर द्वीपांत राज्य करीत होता व त्यावरहि रामानें स्वारी करून त्यासहि जिंकिलें अशी यांत कथा आहे; पण या रावणबंधूनें रामाचा काय अपराध केला होता? केवळ सीतेनें याची हकीगत सां- गून याला जिंकल्याखेरीज राम खरे विजयी कोठें झाल ! ' एवढें ह्मणतांच राम ससैन्य त्याकडे निघाले ! कारणाशिवाय एवढ्याशा निमित्तानें इतरांच्या राज्यावर स्वारी करणारा राम व त्या कार्यों त्यास प्रवृत्त करणारी सीता - हे दोघेह आर्यजनांस मोठेसे प्रिय हो- तील असें नाहीं. तथापि, कवींनीं असे त्यांस केले आहेत. सहस्रवदन रावणानें रामाचा सर्वस्वी पराभव करून त्यास मूच्छित केल्यानंतर सीतेनें महाकराल स्वरूप धारण करून त्या रावणास ठार करून रणां- गणावर थयथयाट केला वगैरे वर्णने आहेत. पुढें देवांनीं रामास उठवि-. ल्यानंतर राम देखील सीतेचें हें भयंकर स्वरूप पाहून घाबरून गेले; तेव्हां सीतेनें रामास दिव्य चक्षु देऊन त्यास आपलें परमशक्ति स्व-