पान:रामायणनिरीक्षण.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १६ वें. १९३ केलेला आहे. जरी राम व कृष्ण हे दोघेहि विष्णूचेच अवतार अस ले, तरी रामास कृष्णाच्या शब्दांचा दाखला देवविण्यांत कालव्य- त्यास होतो हैं या कवीला कळले पाहिजे होतें. -:०: पौरुषच श्रेष्ठ होय ! १३ - ( परिशिष्ट १६ वें. ) पौरुषाविषयीं संस्कृत वाङ्मयामध्यें इतके जोरदार विचार मीं तरी पूर्वी वाचलेले नव्हते ! भारतामध्यें पौरुषाची अनेक ठाई प्रशंसा केलेली आहे ही गोष्ट खरी; तथापि; भारताच्या सद्यःस्वरूप- काळीं तरी दैवाचा पगडाच विशेषेकरून लोकांच्या मनांवर बसला होता, हे कळून येईल; पण हा खाली दिलेला उतारा वाल्मीकीच्या वासिष्ठरामायण ऊर्फ योगवासिष्ठ नामक ग्रंथांतील असल्यामुळे तो आर्यांच्या पौरुषकालांतलाच असला पाहिजे. त्यावेळी आर्यांना अझून इकडील राक्षसादि अनार्यजातींशीं वारंवार लढून आपल्या वसाहती ऊर्फ आश्रम स्थापावे लागत असत. तेव्हां तशा काळींच पौरुषाचें महत्व लोकांस वाटणार हे उघड आहे. असो. खालील उतारा योग- वासिष्ठ, ( प्रकरण दुसरें, सर्ग ४ ते १० मधील ) आहे. उताऱ्यांचा श्लोकानुक्रमनंबर माझा स्वतःचा आहे; तो मुळांतील नव्हे. पौरु- ाच्या श्रेष्ठत्वाविषयीं हा उपदेश श्रीरामास वसिष्ठ ऋषींनीं विश्वा- मित्राबरोबर रामलक्ष्मणांस पाठावेण्याच्या पूर्वी केलेला आहे.