पान:रामायणनिरीक्षण.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० रामायणनिरीक्षण. नृणां हि सदृशं रामचरितं वर्णितं ततः || सीतामाहात्म्यसारं यद्विशेषादत्र प्रोक्तवान् ॥ १० ॥ शृणुष्वावहितो ब्रह्मन् ! काकुत्स्थचरितं महत् सीताया मूलभूताया प्रकृतेश्चरितं महत् ॥ ११ ॥ आश्चर्यमाश्चर्यमिदं गोपितं ब्रह्मणो गृहे । हिताय प्रियशिप्याय तुभ्यमावेदयामि तत् ॥ १२ ॥ या उताऱ्यावरून हें अद्भुतरामायण ह्मणजे ब्रह्मलोकांत राहिले- ल्या शतकोटि प्रविस्तर दिव्यरामायणाचाच एक भाग आहे, असे दाखावण्याचा कवीचा हेतु आहे. मनुष्यलोकी असलेलें व मनुष्याप्र- माणें रामाचें चरित्र सांगणारें रामायण २५००० चें असून त्यांत सीतेचें माहात्म्य नसल्यामुळे, रामास परमपुरुष व सीतेस मूलभूता प्र- कृति मानणाऱ्या एकाद्या कवीनें हें आश्चर्यमय रामायण बनवन चाल्मीकीच्या नांवावर जगापुढें झोंकून दिलेलें आहे !!! यांतील कि- त्येक कथा पोरकट व कित्येक आश्चर्यमय आहेत. वाल्मीकीच्या रा- मायणाशीं याचा कोठेंकोठें विरोध येतो हें दाखवितों :- 1- ( १ ) सीतेची उत्पत्ति सांगतेवेळी महालक्ष्मी नारदाच्या शापाने पृथ्वीवर अवतीर्ण झाली असे सांगून, पुढे ती कशी अवतीर्ण झाली हे सांगत असतां, खालील हकीकत दिलेली आहे. दंडकारण्यांतील ऋषींकडे एकदां येऊन रावणानें त्यांचें रक्त एका घागरींत सांठविलें. गृत्समद नामक ऋषीनें, आपल्या भार्येच्या विनंतीवरून, 'लक्ष्मी माझी कन्या होवो ' अशा संकल्पानें मंत्रून एका घागरींत दूध नित्य सोडिलें होतें. रावणानें त्याच दुधाच्या घागरीत रक्त सांठवून तो घट मंदोदरीपाशीं आणून ठेविला व तिला सांगितलें कीं यांतील रक्त विषाहून वाईट आहे. रावण नेहमीं परस्त्रियांशीं रत होत अस- १२९१ दछ्ञ