पान:रामायणनिरीक्षण.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १४ वें. रामाश्वमेधपर्व. १८७ (परिशिष्ट १४ वें.) रामाश्वमेधपर्व भवभूतीहून बरेंच प्राचीन असावे असे मी दुसरी- कडे दाखविलेंच आहे. ते निदान इ. स. च्या ४ थ्या शतकाइतकें तरी प्राचीन असावें; त्यांत रामकथेविषयीं काय काय विशेष मिळतात हें पाहूं; म्हणजे रामकथेंत ऐतिहासिकदृष्ट्या कसेकसे फरक पडत गेले हें कळून येईल. ( १ ) अहल्या शिळा होऊन पडली होती ही समजूत तेव्हा प्रचलित झाली होती ( २९ - ३७; व ३६-१३ पहा ) :- - यस्य पादतलस्पर्शात शिला वासवयोगजा । अहल्या गौतमवधूः पुनर्जाता सुरूपिणी ॥ ३६-१३ ॥ ( २ ) कावळ्यावर रामानें ईषिकास्त्र सोडल्याचा उल्लेख आहे:- काकः परं पदं प्राप्तो यद्वाण स्पर्शनात् खगः ॥ २९-३७ ॥ ( ३ ) सीता अयोनिजा असल्याविषयीं उल्लेख आहे:- उपयेमे विवाहेन रम्यां सीतामयोनिजाम् ॥ ३६-२६ ॥ ( ४ ) रामाचें चरित्र 'शतकोटिप्रविस्तर ' होतें अशी सम- जूत होती :- 11 चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । येषां वै यादृशी बुद्धिः ते वदंत्येव तादृशम् ॥ १-१३ ॥ ( ५ ) राम अश्वमेधयज्ञाच्या वेळीं स्वर्णपत्नीसमन्वित होता ( १०-३२ )