पान:रामायणनिरीक्षण.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ रामायणनिरीक्षण. रामायणापेक्षां हा रामोपाख्यानाचा काळ प्रगति पावलेला होता है नावांच्या उल्लेखावरून कळतें:- नावो न संति सेनाया बव्ह्यस्तारयितुं क्षमाः । वाणिजामुपघातं च कथमस्मद्विधश्चरेत् । विस्तीर्ण चैव सैन्यं च हन्याच्छिद्रेण वै रिपुः । - सेतु ' अद्यापि ' प्रसिद्ध असल्याविषयीं रामोपाख्यानांत उल्लेख आहे:- दशयोजन विस्तारमायतं दशयोजनम् । नलसेतुरिति ख्यातो योऽद्याऽपि प्रथितो भुवि ॥ ( २० ) रावण ब्रह्मास्त्रानें खाक झाल्याचाच तेवढा उल्लेख आहे. वा. रा. प्रमाणे त्यांत त्याचीं मस्तकें तोडली जाऊन वारंवार तीं पुनः उगवल्याचा उल्लेख नाहीं. याप्रमाणें, एकंदरींत पाहतां, रामोपाख्यानांतील रामकथेत अद्भुत- पणाचा भाग बराच कमी असल्यामुळे रामायणाच्या हल्लींच्या स्वरूपा- हून ( इ. पू. १०० ) तें • आख्यान बरेंच पूर्वीचें दिसतें. रामकथेंत कसकसे फरक पडत गेले हैं पाहण्यास जसा कतकादि प्राचीन लोकांच्या व कालिदासाच्या व पुराणांतील रामायणकथांचा उपयोग होणार आहे त्याचप्रमाणे महाभारतांतील रामोपाख्यानाचाहि होणार आहे. यामुळे येथें त्या विचाराचें इतकें सविस्तर विवेचन केलेले आहे.