पान:रामायणनिरीक्षण.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १३ वें. १८५ ( १५ ) रामोपाख्यानांत सीतेला विदेहराजाची कन्या ( आत्म- जा ) म्हटलेले असून ती अयोनिजा किंवा भूमिकन्या असल्याचा कोठें उल्लेख नाहीं: -- विदेहराजो जनकः सीता तस्यात्मजा विभो । यां चकार स्वयं त्वष्टा रामस्य महिषीं प्रियाम् । ( १६ ) रावणाची उत्पत्ति भिन्नपणें दिलेली आहे:- स राजराजो लंकायां न्यबसन्नरवाहनः । राक्षसीः प्रददौ तिस्रः पितुर्वै परिचारिकाः ॥ पुप्पोत्कटा च राका च मालिनी च विशांपते । पुप्पोत्कटायां जज्ञाते कुंभकर्णदशग्रीवौ ॥ मालिनी जनयामास पुत्रमेकं बिभीषणम् । राकायां मिथुनं जज्ञे खरशूर्पणखे तथा || ( १७ ) रामाला विष्णूचा अवतार म्हटलेले असले तरी पाय- साची गोष्ट रामोपाख्यानांत दिलेली नाहीं. ( १८) सीताहरणाचे वेळीं रावणाच्या रथाचा उल्लेख नाहीं, तो तिला घेऊन बर उडाला:- मूर्धजेषु निजग्राह उर्ध्वमाचक्रमे ततः ॥ ( १९ ) सेतुबंधनाची गोष्ट वेगळ्या तऱ्हेनें दिलेली आहे. समु- द्वानें स्वप्नांत येऊन नळानें सेतु बांधावा म्हणून सुचविलें आहे. रामानें समुद्रावर रागानें शरसंधान केल्याची हकीकत यांत नाहीं. शिला तरल्याची कथा रामायणांत नाहीं; पण ती खालील श्लोकां- वरून निघाली असावी:- यत्काष्ठं वा तृणं वापि शिला वा क्षेप्स्यते मयि | सर्वे तद्धारयिष्यामि स ते सेतुर्भविष्यति ॥