पान:रामायणनिरीक्षण.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ रामायणनिरीक्षण. "The substantial agreement, however, in the course of the narrative, frequently even in the form of expression, is so very marked that we are involuntarily led to regard it as a kind of epitome of the work of Valmiki. वाल्मीकिरामायणाविषयींचे भारतांतील सर्व उल्लेख रा. अभ्यंकर यांनी सविस्तरपणें दाखविलेले आहेत. रामायणाला हल्लींचें स्वरूप केव्हां प्राप्त झालें याविषयीं विचार करितेवेळीं एक गोष्ट लक्षांत ठेवणें अगदीं जरूर आहे; ती ही कीं, कालिदासानें रघुवंश लिहिला तेव्हां रामायण हल्लीं ज्या स्वरूपांत आहे त्याच स्वरूपांत होतें. रामायणाला सद्यःस्वरूप मिळाल्यानंतर बऱ्याच शतकांनीं कालिदास होऊन गेला असावा. रामायणाच्या सद्य:स्वरूपांत महा- भारतांतील काच्चदध्याय ( संबंध नसतां ) उतरून घेतलेला अस- ल्यामुळे भारतांतील रामोपाख्यान रामायणाच्या सद्य: स्वरूपाहून प्राचीनतर असावें. भारतांतील रामोपाख्यान रामायणाचेंच साररूप असल्यामुळे मूळचें रामायण भारताहून प्राचीनतर आहे हे सिद्ध होतेंच. हें मूळ रामायण दशरथजातकाहून प्राचीनतर होतें कीं नाहीं याचाहि आपण आतां विचार करूं. “ मूळ रामायणांत रामास विष्णूचा अवतार म्हणून दाखविण्याचा प्रयत्न केला होता, असें वाटत नाहीं; भारतांतील रामोपाख्यानांत हें रामाचें विष्णुत्व आढळतें.. बौद्धधर्मानंतर हे वैष्णव स्वरूप भारतरामायणास आलें," असें कित्येक लोक-विशेषेकरून रा. ब. वैद्य-म्हणतात; असें धरिल्यानें भारतांतील रामोपाख्यानहि बौद्धधर्मा उदयानंतरचें धरावें लागतें. " पा- ख्यानाहून प्राचीन असें वाल्मीकीचें मूळ रामायण दशरथजातकाहू- नहि प्राचीनतरच असावें; कारण, त्यांत हल्लींच्या रामायणांतील २।३