पान:रामायणनिरीक्षण.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १३ वें. श्लोक पाठभेदानें आढळतात. या एकदंर प्रमाणांवरून वाल्मीकीचे मूळचें रामायण बौद्धधर्माच्या उदयापूर्वीचेंच आहे हें कळून येतें. आतां भारतांतील रामोपाख्यान व हल्लींचें रामायण यांतील रामकथेंत काय काय विशेष आढळतात हे आपण पाहूं:- - ( १ ) रामोपाख्यानांत रावणाचा पूर्वेतिहास सांगण्यापासूनच सुरवात केलेली असल्यामुळे तेव्हां उत्तरकांड माहीत होते हैं कळून येतें. ( २ ) दशरथाचा पुत्रकामेष्टि किंवा हयमेध यज्ञ, रामाचें शिक्षण व लग्न, व बालकांडांतील बहुतेक विषय - या रामोपाख्यानांत आढळत नाहींत. ( पण यांस कारण असे आहे कीं, द्रौपदीहरणप्रसंगी ही कथा सांगितलेली असल्यामुळें तत्प्रसंगास अनुसरून सीताहरणाचीच तेवढी कथा तेथें सांगितलेली आहे. बाकीच्या गोष्टींचा समारोप करण्याचें कारण या ठिकाणीं तरी कवीला वाटले नसावें ). ( ३ ) अयोध्या व अरण्य या कांडांतील हकीकतीचा समारोप थोड्याशाच श्लोकांनी करण्यांत आलेला आहे. ( ४ ) सविस्तर हकीकत शूर्पणखेच्या निरूपणापासून आहे. ( ती वरील धोरणासच अनुसरून आहे. ) ( ५ ) यांत कबंधास पुनः जीव प्राप्त झालेली हकीकत नाहीं. (६) शबरीची हकीकत यांत नाहीं. ( ७ ) सीतेला ब्रह्मदेवांनीं जें स्वप्न पाडिलें होतें, त्याची हकीकत 9 यांत नाहीं.