पान:रामायणनिरीक्षण.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० रामायणनिरीक्षण. ( ४ ) रामायणाचें सद्य: स्वरूप. ( इ. पू. १०० ) ( ५ ) कालिदास व इतर संस्कृत कवि यांची रामायणकथा. ( ५ वें शतक ). ( ) पुराणांची रामायणकथा, विशेषेकरून पद्मपुरा- णांतील ) व अध्यात्मरामायण ७ वें शतक ). 4 ( ७ ) तुळशीदासादि आधुनिक कवींचीं रामायणें. महाभारतांतील रामायणकथा हल्लींच्या रामायणांतील कथेपेक्षां अधिक साधी व अद्भुतपणा कमी असलेली व अत एव प्राचीनतर असावी, ही गोष्ट रा. वैद्य व वेबर यांस मान्य आहे. यामुळे महाभा- रतांतील रामोपाख्यान रामायणाच्या सद्यःस्वरूपाहून प्राचीनतर आहे हे कळून येईल. हें रामोपाख्यान, कोणासहि एकाद्या जुन्या ग्रंथाचं साररूपच वाटणार यात शंका नसल्यामुळे, वाल्मीकीचें मूळ रामायण महाभारताहून प्राचीनतर होतें हें कळून येतें; व हल्लींच्या महाभारतांत रामायणांतील बरेच लोकहि आढळलेले आहेत. रा. महादेव गोविंद अभ्यंकर यांनी ते सारे श्लोक दाखविलेले आहेत. हरिवंशांत देखील ( विष्णुपर्व, अ. ३१) रामायणांतील एक श्लोक याप्रमाणे उतरून घेतलेला आहे; ( कंसाची आई ह्मणते) :- रावणेन पुरा गीतः श्लोकोऽयं साधुसंमतः । बलज्येष्ठेन लोकस्य राक्षसानां समागमे ॥ ४४ ॥ एवमूर्जितवीर्यस्य मम देवनिघातिनः । बांधवेभ्यो भयं घोरं दुर्निवार्य भविष्यति " ॥ ४५ ॥ इतकेच नव्हे, तर रामायणास ' महाकाव्य ' म्हटलेले असून त्यांतील (उत्तरकांडांतील देखील ) विषयांवर भारतकाळीं नाटकेंहि होत असत:-