पान:रामायणनिरीक्षण.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट १२ वें. १७९ रा. अभ्यंकर यांनी दिल्याप्रमाणें ३९ सर्ग व ५२८ श्लोक हल्लीं रामायणांत अधिक आहेत. गौडप्रत स्वतःच आपली श्लोकसंख्या च सर्गसंख्या सांगते त्याप्रमाणें पाहतांहि त्यांत ६० सर्ग जास्त असून लोकसंख्या मात्र तेवढीच आहे ! ! ! गौडप्रतीची हल्लींची श्लोकसंख्या पाहिली असतां सहा कांडांत ५७ सर्ग अधिक आहेत; उत्तरकांड नसल्यामुळे यांत श्लोकसंख्या किती अधिक आहे, सांगता येत नाहीं. भारतांतील रामोपाख्यान. परिशिष्ट १३ वें. महाभारताला सद्यःस्वरूप निदान इ. पू. २०० च्या पूर्वीच आलेलें आहे असें रा. ब. वैद्य यांचें मत आहे; त्यांत रामोपाख्यान होतें. बौद्ध दशरथजातक रामायणाचे पूर्वीचें असून हल्लींचें रामायण स. च्या प्रारंभी लिहिलें गेलें असें वेबर इत्यादि पाश्चात्यांची मतें आहेत. हल्लींच्या रामायणांत ' कांहीं' भाग नवा व ' बहुतेक भाग जुनाच' आहे, याबद्दल शंका बाळगण्याचें कोणासहि कारण दिसत नाहीं. रामकथेच्या वेगळाल्या ग्रंथांचा पूर्वापरभाव ठरविणें जर कठिण आहे; तथापि, सूक्ष्म विचार केला असतां, खालीं लिहिल्याप्र- माणें व्यवस्था लागेल असे वाटतें. ( १ ) मूळचें वाल्मीकींचें रामायण (बौद्धांपूर्वीचें. ) ( २ ) दशरथजातक. ( इ. पू. ४५०-३००) ( ३ ) महाभारतांतील रामोपाख्यान. ( इ. पू. २००)