पान:रामायणनिरीक्षण.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. अथागमनमृषीणां च शत्रुघ्नस्य विसर्जनम् || बने प्रसूतिं सीताया लवणस्य रणे वधम् । कालदुर्वाससोः प्राप्तिः लक्ष्मणस्य विसर्जनम् ॥ स्थापयित्वा यथा पुत्रान् रामो राज्ये दिवं गतः । यांवरून हल्लीं गौडप्रतींत जरी उत्तरकांड छापिलें नसले तरी त्या प्रतींत तें कांड आहे हें यावरून कळून येईल. गौडप्रतीपेक्षां मुंबई प्रतीं- • तच जुने विचार पुष्कळ ठिकाणीं अधिक आहेत असें रा. ब. वैद्यांनीं दाखविलें आहे. इ. पू. १०० च्या सुमारास रामायणास सद्य: स्वरूप प्राप्त झाल्यानंतरच रामायणाच्या या दोन प्रती निघाल्या असे त्याचें मत आहे. अयोध्याकांडांतील कच्चित् सर्ग व किष्किंधा कांडांतील कुरुक्षेत्र मध्य धरून सांगितलेले भौगोलिक सर्ग हे दोन्ही मुंबई प्रतीप्रमाणेच गौडप्रतींतहि आहेत; तथापि, गौडप्रत निघाल्यानंतरह कांहीं भाग मुंबई प्रतींत जोडण्यांत आलेले आहेत. ( राम जन्माचे वेळची ग्रहस्थिति, बुद्धविषयींचा श्लोक वगैरे. ) रामायणांत कृतक, महेश्वर, व रामाश्रम यांचे वेळेपर्यंतहि सारखे प्रक्षेप चालू होते, हें त्यांचे लिहिण्यावरून कळून येतें. रा. ब. वैद्य यांनी रामायणास सद्य:- स्वरूप इ. पू. १०० चे सुमारास प्राप्त झालें असें दाखविलेलें आहे. त्यानंतरच रामायणाच्या या दोन प्रती निपजल्या असाव्यात असें ते म्हणतात. गौडप्रत अधिक प्राचीन व विश्वसनीय आहे असें कित्येक समजतात; पण रा. ब. वैद्य यांस तसे वाटत नाहीं. मुंबईप्रतींत जुन्याचें रक्षण अधिक चांगल्या रीतीनें झालें आहे असे त्यांचें मत आहे. भवभूतीनें उतरून घेतलेला ' त्वदर्थमिव विन्यस्तः शिलापट्टोऽ यमग्रतः ' हा श्लोक ज्यांत आहे असा प्रक्षिप्त सर्ग ( व काक व १७४