पान:रामायणनिरीक्षण.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ११ वें. रामायणाच्या भिन्न प्रति. (परिशिष्ट ११ वें.) रामायणाच्या सध्यां मुख्यत्वेंकरून दोन भिन्न भिन्न प्रति आहेत... पहिली मुंबईप्रत; दुसरी, गौडप्रत. गोरेशियो यानें गौडप्रत छाप- लेली असल्यामुळे गौड प्रतीस कोणी गोरेशियोप्रत असेंहि ह्मणतात; पण सोईसाठी मी गोरेशियोनें छापलेल्याच प्रतीस गौडप्रत असें म्हणतो. सध्यां जी गौडप्रत छापलेली आढळते, तींत गोरेशियोनें उत्तरकांड छापलेले नसल्यामुळे रा. अभ्यंकर यांचा असा समज नव्हतेंच ! पण ही वैद्य यांन झाला कीं गौड त्यांची समजूत मूळपासून उत्तर कांड चुकीची आहे, असें रा. व. The Ridile of the Ramayana (पृ. १८१-१८२) या पुस्तकांत दाखविलें आहे. गोरेशियोनें जरी आपल्या प्रतींत उत्तरकांड छापिलें नाहीं, तरी गौडप्रतींत उत्तरकांड होतेंच; तें छापणारास उपलब्ध झालें नसेल एवढेच ! गौडप्रतींत बालकांडास आदिकांड अर्से म्हटलें आहे; आदिकांडाच्या एका सर्वात गौडप्रतींत (अर्थात्) प्रत्येक कांडांतील सर्गसंख्या व श्लोकसंख्या दिलेली आहे; त्यांत शेवटच्या कांडास ' अभ्युदयिकं सभविष्यं सोत्तरं' असें म्हणून त्याचीहि सर्गसंख्या व श्लोकसंख्या दिली आहे; तसेंच उत्तरकांडांतील विषयहि गौडप्रतींत याप्रमाणे दिलेले आहेत:- - १७३:. राक्षसानां समुत्पत्तिं रावणस्य जयं तथा । सीतायाश्च परित्यागं प्रकृतीनां च रंजनम् || प्राप्तराज्यस्य रामस्य चरितं यच्च श्रीमतः ।