पान:रामायणनिरीक्षण.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९७२ रामायणनिरीक्षण. निपुणं निवार्य वचनं सर्वैः श्रुतं तत्क्षणात् ॥ शुश्रूषामि कथं महाद्भु- ततया स्वात्माश्रयां अन्यथा रक्षाबाधनवादिनीं अथ नृपः किंत्वेतदि- त्याह च ।। १० ।। कुंभश्रोत्रवधः पुरा समजाने प्राप्तो दशास्यो वधं । पश्चादित्ययमन्यथाविरचितं रामायणं भाषते ॥ कोऽयं विप्रवरः • समस्त जनता नास्तिक्यसंपादको । राज्ञां स्थानमुपेत्य वक्ति स मया दंड्योऽथ पूज्योऽथ वा ॥ ११ ॥ अथाह जांबवानमं रघूत्तमं कथां प्रति । रामायणं न तावकं त्विदं हि कल्पितं मतम् ॥ समस्तमत्र विस्त- रात् वदामि देव तत् शृणु | पंकेरुहस्य सूनुतो मया श्रुतं पुरा ह्यभूत् || १२ || जांबवंत विज्ञाप्य रामचंद्रो वचनमाह ॥ १३ ॥ श्रीराम उवाच ॥ कीर्तय पुराणं मे शुश्रूषुः कुतूहलादहं प्रणीतं तत्केन च विज्ञातम् ॥ १४ जांववानथ बभाषे हि विधात्रे नमो नमस्तथैव विधु- भूषण–केशवाभ्याम् ॥ १५॥ अथ पुरातनं रामायणं कथयामि ॥१६॥ ही सर्व प्रस्तावना होय ! या प्रस्तावनेवरून एवढे तरी खास समजतां येईल कीं, पद्मपुराणाच्या सद्यःस्वरूपाच्या कर्त्याच्या दृष्टीनें हें रामायण जांबवानानें रामास सभेत सांगितलें, अशी त्या वेळीं त्याची व समाजाची समजूत होती. जांबवानानें वसिष्ठाकडून हकी- कत ऐकून हें रामायण रचिलें, असें वरच्या वाक्यावरून ध्वनित केलें आहे. पद्मपुराणाच्या कर्त्याला तरी हैं एक पुरातन रामायण वाटत होतें, व त्यांत नेहमींच्या रामायणाहून पुष्कळ ठाई नवा व भिन्न मजकूर आहे ह्मणून त्यास त्यानें अन्यथारामायण असे म्हटलें आहे. आह्मींहि त्याच्याप्रमाणेंच यास " जांबवानाचें अन्यथा रामा- यण " असे म्हटले आहे. रामकथेच्या अभ्यासास या रामायणाचा ऐतिहासिकदृष्ट्या उपयोग होईल ह्मणून तिकडे शोधकांचें लक्ष लाविलें आहे. याचा बहुतेक भाग गद्यरूपानेंच आहे.