पान:रामायणनिरीक्षण.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण २ रें.


 ( ३ ) रा० अभ्यंकरांनी आपल्या' वाल्मीकि रामायण' नामक निबंधांत (पृ. १७६) दुसऱ्या एका पद्धतीनें रामाचा काळ काढण्याचा यत्न केलेला आहे. रामायणकाळी श्रावणांत वर्षाऋतु सुरु होई असे दोनतीन ठाई वर्णन आढळते. ( कि. २६-१४; उत्तरकांड, लव- णवधप्रसंग इ. पहा ). सध्यां पावसाळा ज्येष्ठांत सुरू होतो; ह्मणजे - तो रामायणापेक्षां दोन महिने मार्गे आला आहे. संपात ३० अंश मागें हटला ह्मणजे एक महिना पावसाळा मागें येतो, ह्मणून दोन महिने पावसाळा मार्गे हटण्यास रामायणकाळापेक्षां संपात ६० अंश मागें आला पाहिजे. संपात एक अंश हटण्यास ७२ वर्षे लागतात; ह्मणजे रामायण झाल्यास आज ७२x६० = ४३२० वर्षे झालीं; जे राम इ. पू. सुमारे २४०० वर्षे झाले, असें यावरून निघतें; एकूण इ. पू. २२००-२५००च्या दरम्यान श्री रामांचा काळ येतो, या विधानास कांहीं बाध येत नाहीं.  ( ४ ) शनीच्या एका स्तोत्रामध्यें, राजा दशरथाचेवेळीं शनीनें रोहिणीशकटाचा भेद केल्यामुळे भयंकर दुष्काळ पडला होता वगैरे माहिती मिळते. ही गोष्ट खरोखरच दशरथाचेवेळीं घडलेली असेल तर ज्योतिषशास्त्रदृष्ट्या किती वर्षापूर्वी शनीनें हा शकटभेद केला होता हैं काढितां येईल. त्याप्रमाणें हा काळ गणितानें काढून देण्यास आम्ही रा. केतकर यांस विनंतीहि केलेली आहे. याचा निकाल पुढे देऊ.


 झाले व तेव्हांपासून कलिंगदेशाचा विजयराज इ. पू. ५४३ मध्ये त्या बेटांत जाई- पर्यंत तेथे वस्ती १८४५ वर्षे पर्यंत नव्हती. बौद्धांची ही स्वतंत्र सिंहलद्वीपां- तीलच परंपरा असल्यामुळे हिला अतिशय महत्त्व आहे. ( भारतीयांनी स्वतः एकदां महाराजावली पाहून वर्षसंख्या बरोबर आहे की, नाहीं हें मूळांतून पाहिले पाहिजे. )