पान:रामायणनिरीक्षण.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रामायणनिरीक्षण.

 ( २ ) रामाच्या काळाबद्दल आणखी कांहीं प्रमाणे आढळतात, तींहि येथे देऊन ठेवितों. आशियाटिक रिसर्चेसच्या सातव्या व्हाल्यू- मच्या ४९ व्या पानांत सीलोनमधील महाराजावली नामक एका बौद्ध ग्रंथांतील ह्मणून एक जुनी परंपरा कॅ. मोहोनी नांवाच्या एका इंग्रज लेखकाने दिली आहे. तिचा सारांश हाः- “ या बेटांत बऱ्याच प्राचीनकाळीं रावणयुद्ध ह्मणून एक मोठें युद्ध झालें; तें बुद्धाच्या निर्वाणापूर्वी ( इ. पू. ५४३ ) १८४१ व्या वर्षी झालें. ही परंपरा बौद्ध ग्रंथकारांनी सिंहलद्वीपांतील रहिवाशां- कडून बुद्धाच्या निर्वाणानंतर मिळविलेली असावी; ही परंपरा जर सिंहलद्वीपवाल्यांनी खरोखर ऐतिहासिक दृष्टीने कायम ठेविली असेल तर तिचें बरेंच महत्त्व स्थापन होईल. या परंपरेप्रमाणे रामरावणयुद्ध इ. पू. २३८८ सालीं झालें हें देखील ठरेल ! कसैहि असो. इ. पू. २२०० ते २५०० च्या दरम्यान रामाचा काळ येतो, असे आम्ही वर ठरविलें आहे, त्यास यानें पुष्टीकरण मिळतें. *


 * " Before the birth of Buddha, the island of Cey- lon was known by the name of Shree Lankaweh ( श्रीलंका ). In former times there was a mighty war in this island termed Ravena Joodde ( रावणयुद्ध ); after which it continued void of population for a term of 1845 years, being overrun by malignant spirits ( राक्षस ' s ). Buddha was then born and in due time took on himself his holy character &c. " As. Re. Vol. VII, p. 49.
 यावरून, सिंहलद्वीपांतील महाराजावली पंथाच्या मते, गौतमबुद्धापूर्वी सिंहल - डीपास श्रीलंका ह्मणत असत; व त्या बेटांत फार प्राचीन काळी रावणयुद्ध नांवाचे युद्ध