पान:रामायणनिरीक्षण.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ९ वें. १६९ काशीखंडांत (स्कंदपुराण ) पाताळी भोगावती गंगेच्या तीरीं पद्मपुरी असून त्या विस्तीर्ण नगरांत वासुकी ( हा नागजातीचा होता ) राज्य करीत होता (पृ. १२१ ) ; व कंकालकेतु नामक राक्षस पाताळांत चंपावती नगरींत राज्य करीत होता, (पृ. २२२) तसेंच पाताळी शेषांची मंदिरें आहेत, तेथें नागकन्या आहेत, ( पृ. ९९ ) अंशीं वचनें आहेत. - काशीखंडकथारस. अलीकडे युरोपीयन लोक अमेरिकेंत जाऊन राहिल्यानंतर त्यांनीं तेथील पूर्वीच्या लोकांविषयीं शोध लाविलेले आहेत. त्या शोधांचें थोडक्यांत सार खालीं देतों. या शोधांवरून एवढी गोष्ट निर्विवाद आहे की, पुरातनकाळीं मेक्सिको देशांत व त्याच्या उत्तरेस एका जातीचे बलाढ्य लोक राज्य करीत होते. हे लोक मोठालीं शहरें व मनोरे बांधीत व नक्षीचीं वगैरे कामें करीत. हे प्राचीन लोक शरी- रानें धिप्पाड, राक्षसी बांध्याचे व शिकार करून उपजीविका कर- णारे होते. त्यांस ' क्कायमेन ' ह्मणत; त्यांच्या मागून ' सिकलंक, ' उल्मैक 'मय, ' 'ओतो (टो) मी, 'सापोटेक, तोलटेक' वगैरे जाती मेक्सिकोंत राज्य करूं लागल्या. या सर्वांस 'नव्ह' असें सामान्य ज्ञातिवाचक नांव होतें. त्यांच्या भाषेस 'नव्हतल' असें ह्मणत. मोक्सिकोंतील लोकांत देवतेस मनुष्यांचा बळी देणें, किंवा १ हें आपलेकडील ' टवटालक' नांवाप्रमाणेच दिसतें. २ काही पुराणांतून, रावणाच्या सांगण्यावरून पाताळांतील अहिरावण व महि- रावण ( रावणाचेच बांधव ) यांनी कालिका देवतेस बळी देण्याकरितां राम. लक्ष्मणांस उचलवून नेल्याच वर्णन आहे. हे पाताळांतील महिकावति नगरीत राज्य करीत, असें वर्णन आहे, हे कालिका देवतेचे भक्तच काल (लि) केय राक्षस असावेत.