पान:रामायणनिरीक्षण.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० रामायणनिरीक्षण. प्रसंगविशेषीं नरमांस भक्षण करणें या राक्षसी चाली प्रचलित होत्या. हे लोक शकापूर्वी तिकडे होते एवढेंच सध्यां समजलें आहे; पण शकापूवींचा पक्का काल समजत नाहीं. स्पेनमधील लोक पंधाव्या शतकांत तिकडे गेले तेव्हां तेथें यांच्याच जातीचे 'अस्टेक' लोक राज्य करीत असत. मेक्सिको देशांतील प्राचीन लोकांप्रमाणेंच फार पुरातनकाळी पॉसिफिक महासागरांतील बेटांतहि नरमांसभक्षक व नरमेध करणाऱ्या लोकांची मोठाली राज्यें असली पाहिजेत, असें हल्लीं उपलब्ध असलेल्या माहितीवरून दिसून येतें. असो. प्राचीन मेक्सिकन लोकच राक्षस कां ? ( १ . ) रामायणांतील पाताळांतील सालंकटकंटा वंशाच्या राक्ष- सांतील नरमांसभक्षण, परदारापहरण, अवधि देऊन नंतर अपहृत स्त्रीशीं विधिपूर्वक लग्न लावून मैथुन करणें अगर तिची कबुली नस- ल्यास तिला खाऊन टाकणे, नरमेध करणे वगैरे चाली प्राचीन मक्सिकन् लोकांतहि होत्या. 6 ( २ ) पाताळांतील 'सालंकटेकटा व टवटालक या नांवाशीं वर्णतः साम्य असणारी मेक्सिकोंतील " सीकोटेंकटल ' व 'तोलटेक' हीं नांवें आहेत. , ( ३ ) आमच्या ग्रंथांत वर्णिलेल्या पाताळांतील ' मय ' नामक जातीचें वर्णन, मेक्सिकोंतील 'मय ' जातीशी जुळतें. – येषु मयेन मायाविना विनिर्मिताः पुर: ( नगराणि ) विचित्र - भवन - प्राकार. गोपुर – सभा - चैत्य - चत्वर - आयतनादिभिः गृहोत्तमैः समलंकृताश्च. कासंति । हे मोठालीं शहरे बांधण्यांत प्रवीण होते. भारतकालीन ' मय ' हा याच जातीचा कोणी तरी शिल्पज्ञ हिंदुस्थानांत आलेला असावा.