पान:रामायणनिरीक्षण.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ९ वें. १६७ पाताळांतील मुख्य शहरें होत. कन्यापुरी कोणाची हे कळत नाहीं. निवातकवच, कालकेय व कालखंज हीं संस्कृत भाषेतील भाषांतरें दिसतात. निवातकवच म्हणजे बळकट कवचें धारण करणारे. काल- केय व कालखंज ह्यांचे अर्थ कळत नाहींत. या तिन्हीं जातीविषयीं स्कंदपुराणाच्या केदारखंडांत एक श्लोक आहे तो अत्यंत मह- त्त्वाचा आहे:- कालखंजा महारौद्राः कालिकेयास्तथाऽपरे । निवातकवचाः सर्वे टवटालकसंज्ञकाः ॥ १९.१०२ ॥ यांत, कालखंज व कालिकेय जातीचे दैत्यांस ( निवातकवच = बळकट कवचाचे, असें विशेषण देऊन ) यांस टवटालक संज्ञा होती असे म्हटले आहे. पाताळांतील रावणाच्या सालंकटंकटा वंशा- प्रमाणें, हाहि ( टवटालक नांवाचा ) वंश राक्षसांचाच असून, हीं दोन्हीं नांवें राक्षसी भाषेंतील असावींत असे वाटतें, टवटालक संज्ञक राक्षसांची जात या दृष्टीने महत्त्वाची आहे. टवटालक हा शब्द संस्कृत नसून राक्षसी भाषेतलाच असावा. असो. भागवत, पंचमस्कंध, अ० २४ मध्यें पातालाविषयीं जीं वर्णनें आहेत त्यांतील कामापुरतीं अवतरणें येथे देत आहे:- - “ ततोऽधस्तात् यक्षरक्षः पिशाच-प्रेतभूतगणानां विहारा.... । अधस्तात् सप्तभूमिविवरा.... अतलं सुतलं वितलं तलातलं महातलं रातलं पातालं इति । एतेषु हि बिलस्वर्गेषु.... दैत्यदानवकाद्रवेयाः.... निवसंति । येषु मयेन मायाविना विनिर्मिताः पुरः ( शहरें ).... विचित्र-भवन-प्राकार-गोपुर-सभा-चैत्य-चत्वर-आयतनादिभिः विवरे- श्वरगृहोत्तमैः समलंकृताः चकासंति । अथातले मयपुत्रो असुरो बलो निवसति.... यस्य च.... मुखतः त्रयः स्त्रीगणाः उदपद्यंत । स्वैरिण्यः