पान:रामायणनिरीक्षण.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. जलप्रळयाची हकीकत अमेरिकेतील युरोपियनांच्या पूर्वीच्या लोकांत देखील ज्या अर्थी आहे त्या अर्थी मध्य आशयांतील कॉके- शन् जातीचे लोक तिकडे प्राचीन काळीं जलप्रलयानंतर गेले होते, अशी पाश्चात्य इतिहासकारांची समजूत आहे. दक्षिण अमेरिकेतील लोक वर्णानें अगदीं गोरे होते व त्यांच्यांत मोठालीं शहरें व संस्था होत्या, असें स्पेनिश लोकांनी लिहिले आहे. उत्तर अमेरिकेतील ( मेक्सिकोमधील ) लोक मात्र रानटी, नरमांसभक्षक, व काळ्या वर्णाचे होते. सारांश, जलप्रलयानंतर ( व रामायणाच्या काळापूर्वी ) मध्य आशयांतून एक गौरवर्णाची कॉकेशन् जात हिंदुस्थानांतून जाव्हा, सुमात्रा वगैरे बेटें उल्लंघून तसेंच पूर्वेकडे फिरत फिरत दक्षिण अमेरिकेंत जाऊन पोंचली असावी, अशी पाश्चात्य प्राचीन इतिहास - कार मि. स्मिथ् यांची समजूत आहे. नाग लोकांविषयीं आमच्या प्राचीन ग्रंथांत जे अनेक उल्लेख येतात, त्यावरून पहातां ते गौर- वर्णाचे व सुंदर रूपाचे मध्य आशयांतील लोक असून हिंदुस्थानांत त्यांच्या बऱ्याच वसाहती झालेल्या होत्या; व रामायणाच्याहि पूर्वी यांपैकी कित्येक लोक हिंदुस्थानांतून पुढे ( जाव्हा आदि बेटांतून ) जाऊन पाताळांत भोगवती शहर स्थापिलें होतें, असें कळून येतें. तेव्हां, दक्षिण अमेरिकेंत स्पॅनिशू लोकांस गौरवर्णाचे जे लोक आढ- ळले ते बहुधा आमचे इकडून जाऊन राहिलेल्या नाग लोकांचे वंशजच असावेत; व भोगवती शहर हें सध्यांचें दक्षिण अमेरिकें- तील Bogota शहर असावें, असा माझा ग्रह झालेला आहे. पातालांत निवातकवच, कालकेय, व कालखंज वगैरे जातीचे दैत्य असल्याविषयीं अनेक ठाई उल्लेख आहेत. निवातकवचांचे हिरण्यपुर, कालकेयांचें अश्मनगर व नागांचें भोगवती शहर हीं