पान:रामायणनिरीक्षण.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ९ वें. ९ ८ किंवा त्याहूनहि कमी माहिती वाल्मीकीच्या वेळीं पाताळाविषयीं आर्योस असावी, तथापि, 'पाताल ' किंवा ' रसातल ' हे त्यावेळी काल्पनिक मानिलेले नसून राक्षस ज्या भूभागाकडून आले त्या भूभागाचे वाचक ह्मणून योजिलेले आहेत. तेव्हां पाताळ किंवा रसा- तल याचे साधे अर्थ काय होतात, हें पाहूं. पाताल ( पादतल= पाताल; Antipodes ) म्हणजे आपल्या पायाखालचा ( भूगोलावरील विरुद्ध भागचा ) प्रदेश. पृथ्वी वाटोळी आहे ही कल्पना आर्यांच्या ऋग्वे - दांत देखील आढळते. रसातल ह्मणजे भूमीचा तळ. या दोन्ही शब्दांनीं आपण हल्लीं ज्यास अमेरिका ह्मणतों त्याच देशाचा पूर्वी कसा बोध होत असे, हेंच आपणांस आतां पहावयाचें आहे. पाताळाची वर्णनें. पाताळांत किंवा रसातलांत नागलोकांची भोगवती नगरी आहे, असें रामायणांत व पुराणांत वर्णन आहे. सह्याद्रिखंडांत ( ४.२ ) पाताळांत हिरण्यपूर व कन्यापूर हीं शहरें, व निवातकवच व काल- केय नामक दैत्य असल्याचें वर्णन आहे. सह्याद्रिखंड अध्याय ४ मध्यें पाताळांत खालील नरक असल्याचें वर्णन आहे:-मक्षिका, रौरव, शूकर, ताल, कुंभीपाक, गलग्रह, अधोमुख, वैतरणी ( नदी ), असिपत्र, ताम्रारुणा ( नदी ), करंभ (वाळवंट ), शुनारक (वन). ह्रीं जीं नरकें ह्मणून दिली आहेत, ती किंवा त्यांतील कांहीं पाता- ळांतील नद्या, वाळवंट, वनें वगैरे स्थळांची नांवें असावीत असें चाटतें. मक्षिका हें बहुधा Mexico मेक्सिको असावें. नागांची भोगवती नगरी ही बहुधा दक्षिण अमेरिकेतील Bogota बोगोटा नगरी असावी. भोगवती शहर समुद्रकांठापासून कांहीं अंतरावर होतें असें वर्णन आहे, Bogota ही सध्यां तशीच आहे. नागांची वसा- हत दक्षिण अमेरिकेतच कां असावी हे आपण पाहूं.