पान:रामायणनिरीक्षण.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ रामायणनिरीक्षण. नंतर रावणानें सीतेचें हरण केल्याची व रामचंद्रजी तिचा शोध करीत आल्याची व हनुमानादि वानरांच्या साहाय्यानें युद्ध करून तिला रावणाकडून ( त्याचा वध करून ) आणल्याची कथा बहु- तेक आपल्याकडच्या कथेसारखीच आहे. रामरावणयुद्ध संपून राम अयोध्येस गेल्यानंतर हनुमान् करणकुंडलपुरांतच बरीच वर्षे राज्य करीत होता व पुढे त्यास वैराग्य उत्पन्न होऊन त्यानें दिगंवर जैन मुनीची दीक्षा घेतली अशी जैनांची माहिती आहे. शेवटीं त्यांस मांगीतुंगी पर्वतावर ( मनमाड स्टेशनावरून २४ कोसांवर ) केवलज्ञान झालें असें त्यांचं मत आहे. पाताळ उर्फ रसातळ म्हणजे अमेरिकाच होय ! (परिशिष्ट ९ वें.) अलीकडे पौराणिक वाङ्मयांतील अतल, सुतल, वितलादि काल्पनिक सप्त पाताले व तेथील नरकवर्णन हीं जर सोडून दिलीं, तर आपल्या कांहीं प्राचीन ग्रंथांत सुतल, रसातल, किंवा पाताल हे शब्द समानार्थी व देशाचे वाचक म्हणून उपयोगिलेले दृष्टीस पडतात, राक्षसांविषयीं लिहितेवेळीं आतीं जे उतारे ( रामायणांतून व इतर पुराणांतून ) दिले आहेत ते अशाच प्रकारचे आहेत. खुद्द रामायणाचे वेळीं देखील राक्षसांचें मूळस्थान जें 'पाताळ ' त्या- विपयीं फारशी विशेष माहितीची कल्पना दिसत नाहीं. पेशव्यांच्या वेळी इंग्रजांच्या इंग्लंड बेटाविषयीं जितकी माहिती होती, तितकीच