पान:रामायणनिरीक्षण.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ८ वें. १६३ नक्षत्रीं झाला असें लिहिलें आहे. सूर्य मेषेंत, चंद्र वृषभेंत, मंगळ मकरांत, बुध मीनेंत, बृहस्पति कत, शुक्र व शनि मीनेंत होते. असें म्हटलें आहे. ३ २ च १ र १२ दुशुश १० मं ११ लढून खर व दूषण पुढे वरुणानें पुनः व त्यास पवन ऊर्फ वायुकुमार ह्यानें रावणाच्या वतीनें या राक्षसांस वरुणाच्या कचाट्यांतून सोडविलें. गडबड केल्यामुळे रावणानें हनुमानास त्यावर पाठविलें व त्यांत हनु- मानास जय मिळाल्यामुळे रावणाने त्याचा बहुमान केला व त्याचें लग्न आपली भाची अनंगकुसुम इजसी करून दिलें ! हुंडा वगैरे पुष्कळ देऊन करणकुंडलपूरचें राज्यहि दिलें! कांहीं काळानंतर हनुमानानें राजा नळाची मुलगी हरमालिनी इजशींहि लग्न केलें, तसेंच किष्किंधा नगरच्या सुग्रीव राजाची मुलगी पद्मरागा इजशींहि हनुमानानें लग्न लाविलें, सुग्रीबाच्या पत्नीचें नांव सुतारा ह्मणून दिलेलें आहे. याशिवाय हनुमानास १००० वायका होत्या अशीहि जैनांची माहिती आहे !!! *

  • या १००० लग्नांच्या बाबतींत मात्र आमचा व जैनांचा अतिशयच मतभेद

आहे !!! आह्मीं हनुमानास आजन्म ब्रम्हचारी समजतों व जैनांनीं तर त्यास १००० बायका करून दिलेल्या आहेत. १२९१ eur