पान:रामायणनिरीक्षण.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. जैन परंपरेप्रमाणें हनुमानाचें चरित्र. ( परिशिष्ट ८ वें. ) पं. प्रभुदयाळ ( तहशिलदार, अंबाला ) यांनी जैन परंपरेवरून इंग्रजीत हनुमानाचें चरित्र लिहिलेले आहे. त्यांत बहुतेक रामा- यणाची कथा आलेली आहे. जैन परंपरेप्रमाणें हनुमानाचें चरित्र यांत मिळतें. प्रारंभीं वानरवंशाच्या राजांची थोडीशी हकीकत दिल्यानंतर वायुकुमार ऊर्फ पवन याचें अंजनीशीं कसें लग्न झालें प्रल्हाद x केतुमति महेंद्र x हृदयवेगा हें दिलेले आहे. वायु- L १६२ कुमाराचा बाप प्रल्हाद हा विजयधिं पर्वता- वायुकुमार ऊर्फ पवन x अंजनी च्या दक्षिणेस असलेल्या आदित्यपुरांतील एक वानरवंशीय राजा होय. राजा महेंद्र हा भरतच्छत्रांतील दंति पर्वतावर महेंद्रपुर नग- रांत राज्य करीत असे. पुढे वायुकुमाराचें अंजनीशीं लग्न झालें. तथापि वायुकुमाराचें तिजकडे विशेष लक्ष नव्हतें. लंकेमध्यें वरुणा- बरोबर रावणाचें युद्ध चाललें होतें, तेव्हां प्रल्हादाला मदतीस वोलाविलें होतें, तेव्हां युद्धाला जाते वेळीं देखील अंजनी- देवीचें वायुकुमारानें दर्शन घेतलें नाहीं. पुढें कांहीं मार्गापर्यंत कूच करून गेल्यानंतर वायुकुमार परत येऊन अंजनीजवळ एक दिवस राहिला व त्यामुळे ती गर्भवती झाली, पुढे तिला हनुमान झाला, जैन परंपरेप्रमाणे हनुमानाचा जन्म चैत्र शुद्ध अष्टमीला श्रवण

  • या राजांच्या ध्वजावर वानराची चित्रे होतीं ह्मणून यांस वानरवंशीय राजे ह्मणत

असत, अशी माहिती जैनांनी दिलेली आहे.