पान:रामायणनिरीक्षण.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण १ लें.

  [ ९ ] वनपर्व [ अ. ८२-८३ मध्ये ] पुलस्त्याचा व भीष्माचा वादविवाद झालेल. आहे. हाच पुलस्त्य रावणाचा पूर्वज होय असें वाटतें.
 [१०] रामाच्याकाळीं मयासुराची कन्या मंदोदरी ही राव- णाची स्त्री होती; मयासुरानें पांडवकालीं पांडवांची सभा बांधिली. हे दोघेहि एकच असे कोठेंहि म्हटलें नाहीं हें मात्र खरें. वरील अनेक अड- चणीच्या प्रश्नांवरून महाभारताच्या सद्यः स्वरूपाच्या कर्त्याच्या मनांत ( इ.पू. २०० । ३०० च्या सुमारास) राम व कृष्ण यांच्या, किंवा वाल्मीकि व व्यास यांच्या, कालाविषयीं ऐतिहासिक दृष्टीच्या अभावामुळे किती घोटाळा माजला होता, हें कळून येईल. रामकालीन व पांडवकालीन बऱ्याच व्यक्ति त्यांनीं समकालीन केलेल्या आहेत; पण हें संभवणार कसे ? भारताच्या सत्रः स्वरूपकर्त्यास बहुतकरून रामांचाहि ऐति- हासिक काळ माहीत नसावा व पांडवांचाहि ऐतिहासिक काळ माहीत नसावा; म्हणूनच हा समकालीनत्वाचा घोटाळा त्यांनी माजवि- लेला आहे.


 *रमाचा काळ ख्रि. श. नंतरच्या ६ व्या शतकांतील पंचतंत्राच्या कयासहि माहीत नव्हता; तो तंत्र ५ वें, कथा ३ रांत म्हणतो:-
 " सांप्रतं को राजा धरणीतले । स आह । वीणावत्सराजः । स आह । अहं ताव कालसंख्यां न जानामि । परं यदा रामो राजाऽऽसीत् तदाहं दारिद्र्योपहतः सिद्धिव- तिंमादाय अनेन पथा समायातः " यावरून ऐतिहासिक दृष्टि, व राम आणि पांडव केव्हां होऊन गेले यात्रिषयीं खरी माहिती - येथील लोकांस क्वचितच असल्याचे कळून येईल; याचा आमच्या इतिहासावर किती वाईट परिणाम झाला आहे, हे निराळें सां- गावयास नकोच ! यांतील वीणावसराज ह्मणजे इ.पू. ५०० च्या सुनाराचा गौतम- बुद्ध समकालीन उदयन राजा होय. (पुराणनिरीक्षण, पृ. २०८ पहा ) यावरून पंच तंत्रांतील कथा मूळ वोग वत्सराजाच्या वेळच्या होत हे कळून येते व तेव्हां देखील आपल्या परंपरेच्या लेकांस रामाच्या काळापासून किती वर्षे झाली होतीं हैं ठाऊक नव्हते