पान:रामायणनिरीक्षण.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ७ वें. रामाचे समकालीन राजे. १५९ ( परिशिष्ट ७ वें. ). महाराष्ट्रांत भारत व अलीकडे पौराणिक ग्रंथ ऐतिहासिकदृष्ट्या वाचण्याची संवय बऱ्याच लोकांस लागलेली आहे. रामायण महाभारताचीं ऐतिहासिक दृष्ट्या बरींच दिरीक्षणे पाश्चात्यांनीं व पूर्वात्यांनी केलेलीं आहेत. मद्रासकडच्या लेखकांनी केवळ कालदृष्टीने या ग्रंथांतील व इतर ठिकाणच्या प्रमाणांची चर्चा केलेली आहे. महाराष्ट्रांत व बंगाल्यांत इतर दृष्टींनींहि पौराणिक ग्रंथांचा अभ्यास झालेला आहे. दे. म. गो. अभ्यंकर व रा. व. चिंतामणराव वैद्य यांचीं रामायण यांचीं निरीक्षणे वाचनीय आहेत; तथापि त्यांनी ग्रंथ लिहि- ल्यानंतर आणखी पुष्कळ माहिती मिळालेली आहे. या अवकाशांत अधिक पौराणिक वाङमयाचें निरीक्षण झालेले आहे. या नवीन प्रकाशानें आजरोजी रामाच्या समकालीन राजांची नांवें, त्यांचे देश व राजधान्या, व त्यांविषयों कोणत्या ग्रंथांत माहिती मिळाली त्यांचीं नांवें येथें देतों. वाल्मीकीय रामायणास वा. रा. म्हणूं. आनंदरामायणास आ. रा. म्हणूं. राजधान्यांची नांवें कंसांत घात- लेली आहेत. ही सर्व माहिती एकत्र करण्याचा एक विशिष्ट हेतु आहे; तो हा कीं, यदाकदाचित् श्रीरामाचा काळ कांहीं साधनांनी या पुस्तकांत ठरविला आहे, त्याहून अधिक निश्चितपणे ठरवितां आला तर त्या काळचे सर्व राजे कळावे. या समकालीन राजां- पैकीं कांहींकांचे पूर्वीचे व नंतरचे वंश मिळतात; त्यावरून काल- निर्णयाला वंशावळींचा उपयोग होईल. इतिहास, कालनिर्णय, व भूगोल यांची बरोबर कल्पना येईल. ज्या राजांच्या मागील व पुढील