पान:रामायणनिरीक्षण.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० रामायणनिरीक्षण. पिढ्या मिळतात ते मुख्यत्वेंकरून हे :-- सीरध्वज जनक, प्रत- र्दन, रोमपाद, प्रतीष, व अजमीढ. बाकींच्याविषयींची माहिती आणखी कांहीं पौराणिक प्राचीन ग्रंथांवरून शोधून काढिली पाहिजे. ती मिळेल तेव्हां मिळो. सध्यां तरी मिळालेली माहिती मी नमूद करून ठेवितों. आनंदरामायणांतील विवाहकांडाचा व रघुवंशांतील इंदुमतीच्या विवाहप्रसंगाचा अत्यंत निकट संबंध आहे. इंदुमतीच्या स्वयंवराचे वेळच्या राजांची नावें कालिदासानेंच आनंदरामायणावरून घेतली आहेत असे वाटतें, कारण, आ. रा. मध्यें कालिदासापेक्षा अधिक विशेष व अधिक नांवें आढळतात. शिवाय, रघुवंशांत कालिदासाने ह्मटले आहे कीं, ‘ पूर्वसूरिभिः' पूर्वसूरींनी केलेल्या ग्रंथांवरून मी हा ग्रंथ लिहित आहे. या अनेकवचनावरून वाल्मिकीशिवाय इतर कवींचेहि रघुवंशावरचे ग्रंथ कालिदासापुढे होते हें सिद्ध होतें. आ. रा. तील विवाहकांड व रघुवंशातील इंदुमतचा विवाहप्रसंग यांचा इतका निकट संबंध आहे कीं, कोणीं तरी एकाने दुसऱ्यावरून आपलें वर्णन घेतलें असावें, असें स्पष्ट वाटतें. देश व राजधान्या. | राजांची नांवें. | प्रतर्दन काशी मिथिला केकय (गिरिव्रज ) | अश्वपति व त्याचा पुत्र युधाजित् रोमपाद अंग ( चंपा ) आधार. वा. रा. उत्तरकांड ( अ- श्वमेव वर्णन पहा ) सीरध्वज जनक | वा. रा. बांलकांड स.१३ " " " "" "27 "