पान:रामायणनिरीक्षण.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ रामायणनिरीक्षण. पारिबर्हेण विधिना स्वेच्छाभिः पितरो ददुः । सीताऽभूद्रत्नमालायां मेनकायां च पार्वती ॥ १७ ॥ द्वयोश्चरित्रं विदितं पुराणेषु महामते । औरस यावरून पितरांची जी मानसी कन्या रत्नमाला, हिच्या पोटीं सीता जन्मली हैं कळून येते. ही रत्नमाला वैदेह जनक ( सीरध्वज) यास दिलेली होती. यावरून सीता ही सीरध्वज जनकाची कन्याच म्हणावयाची ! भारतांत तिला 'आत्मजा ' च म्हटलें आहे. ( विदेहराजो जनकः सीता तस्यात्मजा विभो ॥ ३ - २७३ - १०.) वैदेह जनक सीतेच्या आईचें नांव याप्रकारें एका ऐतिहासिक ग्रंथांत मिळालेले ऐकून कोणासह आनंदच होणार आहे. रत्नमाला दशरथ 1 | सीता x राम श्रीरामांची परम पवित्र जी महिषी सीता तिच्या आईबापांचींहि पुरीं नांवें मिळूं नयेत; कोणीं तीस मंदोदरीची कन्या ठरवावी तर कोणी भूमीची कन्था ठरवावी, तिला कोणी जनकाची पाळलेली मुलगी समजावी तर कोणी ती अयोनिजांच मानावी असा अनिश्चितपणा होता. तो * गर्गाचार्यांच्या या उल्लेखामुळे नाहींसा होऊन सीता ही वैदह जनक व रत्नमाला यांची आत्मजा ( औरस कन्या ) च होय असें निश्चितपणें कळून येतें. ही भारतीय इतिहासांत एक नवीन भरच पडली असे समजावयाचें. १ तस्मादयोनिजा भूत्वा भवेयं धरणीसुता ॥ एवमुक्त्वा प्रविष्टा सा ज्वलितं वै हुताशनम् ॥ उत्तरकांडे अ. १७. * गर्गाचार्यांच्या या ग्रंथांत इतर महत्वाचे विशेषहि आढळतात. त्यामुळे श्रीकृष्णचरित्रांतील कित्येक गूढ भागांवर प्रकाश पडतो. ही सर्व महत्वाची माहिती आह्मी आपल्या श्रीकृष्णचरित्रांत देणार आहों.