पान:रामायणनिरीक्षण.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ६ वें. १५७ एकंदर हकीकतीवरून पहातां जै० अ० पर्चाची मिटक मूळची जुनी दिसते. t सीतेच्या आईचें नांव. (परिशिष्ट ६ वें.) वाल्मीकि रामायणांत कोठेंहि सीतेच्या आईचें नांव मिळत नाहीं; तिला जनकनंदिनी मात्र म्हटले आहे. ती जनकाची औरस कन्या नसून यज्ञाकरितां ( सुवर्णाच्या नांगरानें ) भूमी तयार करीत असतां ती मिळाली ह्मणून तीस सीता असें नांव ठेवण्यांत आलें, अशा कथा आहेत. अद्भुत रामायणानें या विधानावर आपली कल्पना लढवून मंदोदरीनें कुरुक्षेत्रांत आपला गर्म टाकून तो जमि- नति पुरला होता; पुढें तो जनकास वरील तऱ्हेनें मिळाला, असा अद्भुत संदर्भ जोडून दिलेला आहे !!! याप्रमाणें सीतेच्या आई- बापांविषयीं सर्वत्र अनिश्चितपणा आढळतो ! पण एका जुन्या ऐति- हासिक ग्रंथावरून सीतेच्या आईचें नांव वरोवर समजतें, हें आमचें महद्भाग्य होय. श्रीगर्गाचार्याच्या यादवांच्या घराण्याच्या इतिहासावर एक ग्रंथ आहे. त्याचें नांव गर्गसंहिता. हा १२ हजार लोकांचा ग्रंथ आहे. यांत ( १-८ ) मध्ये म्हटलेले आहे कीं:-- पितॄणां मानसी: कन्याः तिस्रोऽभूवन्मनोहराः । कलावती रत्नमाला मेनका नाम नामतः ॥ १५ ॥ कलावती सुचंद्राय हरेरंशाय धीमते । वैदेहाय रत्नमालां मेनकां च हिमाद्रये ॥ १६ ॥