पान:रामायणनिरीक्षण.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. अखेरपर्यंत ही हकीकत आहे. रजकाच्या अपवादामुळे रामानें सीतेला गंगेच्या पलीकडच्या तीरावर लक्ष्मणाकडून जेव्हां वनांत सोडून दिली, तेव्हा तिला गर्भ राहून पांच महिने झाले होते असेंच यांतहि ह्मटलें आहे. लक्ष्मण सीतेला सोडून गेल्यानंतर ती रडूं लागली; तें वाल्मीकीनें ऐकिलें, नंतर वाल्मीकीनें सीतला तिची हकी- कत विचारून, नंतर आपली हकीकत अशी सांगितली आहे:- - वाल्मीकिं मां विजानीहि पितुस्तव गुरुं मुनिम् ॥ ५९-६३॥ यांतहि वाल्मीकि हा जनकाचा गुरु होता असेच ह्मटले आहे. नंतर यथाकालीं सीतेस दोन जुळे पुत्र झाले वगैरे हकीकत जै. अ. पर्वोत दिल्याप्रमाणेंच येथेहि असून, शेवटीं त्यांविषयीं असा एक श्लोक आहे कीं:-- -- उपनीय मुनिर्वेदं सांगमध्यापयत्सुतौ । सरहस्यं धनुर्वेदं रामायणमपाठयत् ॥ ५९-८२ ॥ यावरून सीतात्यागाविषयीं व रामायणरचनेविषयीं व तें ज्यांनीं प्रथम शिकविलें त्यांविषयीं जैमिनि अश्वमेधपर्वत व रामाश्वमेधपर्वत सारखीच हकीकत आहे हे कळून येईल; तथापि, पद्मपुराणांतील या रामाश्वमेधपर्वोत वाल्मीकीनें रामायण आधींच भविष्यानें लिहून - ठेविलें होतें, अशीहि दुसरी समज आढळते; पण ती नंतर कोणी तरी त्यांत घातल्यासारखी दिसते; कारण वरील ठाई तसा कोठें उल्लेख नाहीं. दोन ठिकाणी भविष्यत् ज्ञानाचा उल्लेख आलेला आहे :- वाल्मीकिरास्ते सुमहान् ऋषिधर्मविदुत्तमः । स शिप्यान् पाठयामास भाविरामायणं मुनिः ।। ५७-२० ।। तथाविधौ विलोक्याहं गापयामि मनोहरं । भविष्यज्ज्ञानयोगाच्च कृतं रामायणं शुभम् ॥ ६६-१७ ॥