पान:रामायणनिरीक्षण.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ५ वें. एवढी हकीकत सांगून जैमिनि जनमेजयौस म्हणतो:- युद्धं च पुत्रयोर्यद्वत्पुरा चक्रे पिता रघुः। तथा पार्थस्य पुत्रस्य युद्धं प्रावर्तताद्भुतम् ॥ ८२ ॥ - १५५ ही हकीकत सूत मुनींस सांगून म्हणतो तें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. तें महत्त्वाचें आहे. पारिक्षिताय सकलं कथयामास जैमिनि: । तत्तु युष्मभ्यमाख्यातं मया वै मुनिपुंगवाः || ८३ || नाख्यातवानिदं युद्धं वाल्मीकिः पितृपुत्रयोः । यद्याख्यास्यत् अमज्जिप्यत् लोकोऽयं करुणार्णवे ॥ ८४ ।। . अ. पर्व, अध्याय ३६ वा. यांत, वाल्मीकीनें आपल्या रामायणांत या पितृपुत्रांचे युद्धाचें वर्णन केलेलें नाहीं, असे स्पष्ट ह्नटले आहे. ह्मणजे उत्तरकांडाचा बाकीचा भाग तरी वाल्मीकीनेंच लिहिला; पण त्यांत या युद्धाचें वर्णन मात्र केलें नाहीं, अशी जैमिनिअश्वमेधाच्या सद्य:- स्वरूपकर्त्याची समजूत होती हें उघड होतें. त्यांनीं याचें जें कर दिलें आहे तें कदाचित् परंपरागत असेल. आधींच रामायण करुण- रसानें परिपूर्ण होऊन गेलें होतें; त्यांत अश्वमेंधाच्या वेळीं रामाचें व त्यांच्या मुलांचें युद्ध झाल्याविषयींचें वर्णन - वाल्मीकीच्या लेखणीतून - जर उतरून लोकांस वाचावयास मिळालें असतें, तर लोक करुणार्ण-- वांत बुडूनच गेले असते ! - पद्मपुराणांतील पातालखंडांतील रामाश्वमेधपर्वतहि सीतेच्या व वाल्मीकीच्या भेटीविषयीं हकीकत आढळते. अध्याय ५५ ते ५९ १ अर्जुन व बभ्रुवाहन यांचें युद्ध जेव्हां झाले तेव्हां ही हककित जैमिनिअश्वमे- धांत सांगितली आहे. .17 MAR 1990