पान:रामायणनिरीक्षण.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ रामायणनिरीक्षण. मान्, जांबवान् वगैरे सर्व वीर थकले, तेव्हां अश्वमेवयज्ञासाठ दीक्षित झालेल्या रामानें येऊन कुशास असे प्रश्न विचारिले:-- कुतोऽधीतो धनुर्वेदो भवद्भ्यां यद् हतं बलम् ॥ ३६॥ केनोपनीतौ विधिवत् किंस्विद्वेदे कृतश्रमौ । किंस्वित्कलासु कुशलौ धर्मश्रवणतत्परौ ॥ ३७ ॥ कस्तात: का च जननी कुत्र वासो निवेद्यताम् ॥ ३९ ॥ वरील प्रश्न ऐकून कुश म्हणाला " बाकीची हकीकत घेऊन काय करावयाचें आहे. लढाईस तयार व्हावयाचे असल्यास व्हा. " पुढे रामानें जेव्हां आपल्याला लढावयाचें नाहीं असे स्पष्ट सांगितलें, तेव्हां कुश आपली हकीकत अशी त्यास सांगू लागला:- केवलं सुषुवे सीता क्षमाशीलौ च नौ वने । तातवत्कृतवान् सर्वे जातकर्मादिकं मुनिः ॥ ४३ ॥ उपनिन्ये च वाल्मीकिवदं सर्वमपाठयत् । तथा रामस्य चरितं सन्मनोनिर्वृतिप्रदम् ।। ४४ ।। तत्तदभ्यासयोगेन दृष्टिर्विमलतां व्रजेत् । बुद्धिस्वास्थ्यं मनःस्वास्थ्यं प्रतापश्चाभिवर्धते ॥ ४५ ॥ [ अध्याय ३६ ] हे ऐकून अर्थात् ' हीं आपलींच मुले असून वाल्मीकीनें बापा- प्रमाणे त्यांचे पालनपोषण, अभ्यास वगैरे करविला आहे; व आपलें चरित्रहि लिहून त्यांजकडून म्हणवून घेतले आहे, हें रामास कळून आलें. रामोऽमन्यत पुत्रौ तौ सीताशब्दोपवर्णनात् । धिगस्तु खलु नो युद्धं इत्युत्क्वा धनुरुजौ ॥ ४८ ॥ पण पुढें धैर्य धरून क्षत्रियधर्मास अनुसरून रामानें कुशाबरोबर युद्ध केलें.