पान:रामायणनिरीक्षण.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ५ वें. तत्रत्यमुपचारं तु कल्पयामासुरागताः । मुनिपत्नींनी बाळंतिणीचे सर्व उपचार यथायोग्य केले. सर्वांस हर्ष झाला. वाल्मीकीनें त्यांचीं कुश व लव अशीं नांवें ठेविलीं; जातकर्मादिक कृत्यें केलीं. बाराव्या वर्षी त्यांचें मौजीबंधन केलें. ब्राह्मणभोजनें घातली. वाल्मीकीनें सांग वेद व धनुर्विद्या त्यांस शिकविली. तसेंच बाल्मीकीपासून रामचरित्रहि त्यांनी शिक- ल्याचा उल्लेख आहे:- तस्माद्रामचरित्रं तज्जगतुर्मधुरम्वनौ । लवस्तालधरश्चासीत्; वीणाहस्तः कुशो जगौ ॥ ३३ ॥ १५३ ( जै. अ. पर्व. अ. २९ ) यावरून कुश लव बारा वर्षांचे होण्यापूर्वीच वाल्मीकीनें रामायण रचून ठेविलें होतें हैं उघड होतें. सीताप्रसूतीनंतर १२ वर्षांच्या आंत केव्हां तरी वाल्मीकीनें प्रथम रामायण लिहिलें, हें यावरून कळून येतें. वाल्मीकीनें ही विस्तृत माहिती बहुधा सीतेकडूनच मिळविली असावी; व सीतेनें ती मोकळ्या मनानें वाल्मीकीस सांगि- तली असावी; कारण, वाल्मीकि हा आपल्या बापाच्या ओळखीचा मुनि होता, तेव्हां तो माहेरच्या माणसासारखाच होता. कुश व लव रामचरित्र गाऊं लागले ह्मणजे आश्रमांतील मुनींस आनंद होई: -- आलापैगगनं सर्वे व्याप्नुवन् शृण्वतां मनः । ततस्ते मुनयो हृष्टाः साधु साध्विति चाब्रुवन् ॥ २९.३४ ॥ नंतर रामाच्या अश्वमेधाची हकीकत जैमिनीनें दिली आहे. (अश्वमेधाची हकीकत मागे दिलेलीच आहे ). कुश व लव यांच्या बरोबर युद्ध करून जेव्हां लक्ष्मण शत्रुघ्न, भरत, हनु-