पान:रामायणनिरीक्षण.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. तिनें ‘मी जनकाची कन्या, दशरथाची सून; रामाची भार्या आहें; पण मला कां वनांत सोडलें आहे हें माहीत नाहीं,' म्हणून सांगितलें. नंतर वाल्मीकि ' तुला दोन पुत्र होतील' असा तीस आशीर्वाद देऊन म्हणाले :- “ वाल्मीकिरिति नामाहं मुनिर्जनकपूजितः ॥ ५ ॥ प्राप्ताश्रमं मे रुचिरं पत्रषुप्पफलावृतम् । पर्णशालां विधास्यामि त्वदर्थे वरवर्णिनि ॥ ६॥ यत्र प्रसूतिर्भविता रुचिरा तव जानकि ! वाल्मीकीनें आपण जनकपूजित मुनि आहों असें सांगितल्या- बरोबर सीतेस अर्थातच आनंद झाला; आपल्या प्रसूतीची काळजी चुकली ह्मणूनहि तिला बरें वाटलें. ती त्याजबरोबर आश्रमास गेली. मुनेस्तद्वचनं श्रुत्वा हर्षिता जनकात्मजा । बाढमित्येवमुक्त्वा सा प्रययौ पृष्ठतो मुनेः ॥ ८ ॥ नंतर तिजबरोबर वाल्मीकि आपल्या आश्रमास आले. वाल्मीकीच्या आश्रमांत मुनिपत्नींनीं वगैरे तिचें स्वागत केलें; सीतेनें त्यांस नमस्कार केला. मुनिपुत्रांनीं बांधून दिलेल्या पर्णशालेत ती राहिली. मुनि- पत्नींनी दिलेल्या फलांवर व दुधावर ती राहत असे. नित्य वाल्मी- कीचे पादवंदन करून त्यांनी सांगितलेल्या कथा ती ऐकत असे. नौति स्म चरणौ नित्यं वाल्मीकेः शृणुते कथाः ॥ १५ ॥ ८८ " याप्रकारें आश्रमांत असतां नऊ महिने भरून एके दिवशी रात्रीं सुमुहूर्तावर सीतेला दोन जुळे पुत्र झाले:-- अतीते नवमे मासे जानकी सुषुवे यमौ । निशीथे सुमुहूर्ते च मुनिपत्यो विचक्षणाः ॥ १७ ॥ -१ पूर्वी गरोदरपणी क्षत्रियस्त्रियांस विविध वीरांच्या कथा ऐकवीत; यामुळे भावी गर्भस्थ बालकें शुर निपजत.