पान:रामायणनिरीक्षण.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ५ वें. १५१ यणाच्या रचनेविषयीं जी माहिती मिळेल ती महत्त्वाची असल्यामुळे, त्यांतील महत्त्वाचा भाग खालीं देतों. रजकाच्या अपबादामुळं रामाच्या आज्ञेनें लक्ष्मणानें सीतेस वनांत सोडून दिल्यानंतर सीतेची स्थिति अशी झाली:- — निर्ययौ लक्ष्मणो वीरः पश्यन् तां जनकात्मजाम् ॥ ६१ ॥ पादौ न चलतस्तस्य कृच्छ्रेण महता ययौ । पश्यती जानकी मूर्ति लक्ष्मणस्यापि निश्चला ॥ ६२ ॥ न ददर्श तदा तं तु निपपात धरातले । मूर्छिता जानकी तत्र मुहूर्ते स्माऽवतिष्ठति ॥ ६३ || एकाकिनी बने बाला विललाप मृगी यथा ६४ ॥ पुनर्मूर्च्छामवाप्यासौ जानकी भयविव्हला ॥ ६७ ॥ तदा स्थिता विशालाक्षी रामरामेति भाषिणी ॥ ७२ ॥ विचेष्टंती मुक्तकेशा भूमौ पांसुभिरावृता ॥ ७३ ॥ इतस्ततो धावमाना स्खलंति च पदे पदे । कुशानां कंटकास्तीक्ष्णाः पादयोराचरन् व्यथां ॥ ७४ ॥ सुस्रुवे रुधिरं पद्भ्यां वैदेह्या भरतर्षभ । एवं दुःखातुरा बाला वर्तते सा तदा वने ॥ ७५ ।। अशा स्थितींत सीता असते वेळीं वाल्मीकि ऋषि तेथें आले; सीतेला त्यावेळी किती बरें वाटले असेल बरें ? तावत्स धीमान् बहुभिः समावृतो । वाल्मीकिरुग्रैश्च तपोभिरीडितः । यूपानथच्छेदयितुं मखार्थे । समागतस्तां ददृशे विषण्णाम् ।। ७६ ।। अ० २८ नंतर वाल्मीकीनें सीतेस 'तूं कोण?' असे विचारिलें असतां