पान:रामायणनिरीक्षण.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ रामायणनिरीक्षण. दशास्या' चा, श्लोक ३४ त 'खर ' , राक्षसाचा, श्लोक ५० भरत, शत्रुघ्न, व हनुमानाचा, श्लोक ५१ त बिभीषणाचा व सुग्री- वाचा, श्लोक ५३ त 'वायुसूनू ' चा, श्लोक ५४ त अंगद व जांबवान् यांचा, श्लोक ५४-५५ त धृष्टि, जयंतक, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रबर्धन, अकोप, धर्मपाल व सुमंत्र या मंत्र्यांचा, श्लोक ५७ त नल, वसिष्ठ, वामदेव यांचा उल्लेख आलेला आहे. ही राम्पूर्वतापनीय उपनिषदाची माहिती झाली, 6 (८) उत्तरतापनीयांत सौमित्रि, शत्रुघ्न, भरत व राम यांचा चतुर्व्यूह' सांगितला असून, सीतेला 'मूलप्रकृति' असें मट आहे. रामनाममंत्र काशींत शंकर जपत होता असा उल्लेख आहे :- " श्रीरामस्य मनुं काश्यां जजाप वृषभध्वजः ॥ " श्रीरामच सच्चिदा- नंदघन असून तोच हें विश्व आहे, अशी समजूत याहि उपनिषदांत आहे. याप्रकारें रामाचें, महाविष्णु परमात्मा, सर्वव्यापी, परब्रह्म - यांच्याशीं जरी या दोन्हीं उपनिषदांत पूर्ण ऐक्य प्राप्त झालेले आहे, तरी कलम १, ६, ७, व खालील उतारा यांवरून त्याचें ऐतिहा- सिक स्वरूप व्यक्त होण्याजोगे आहे. रामपूर्वतापनीय उपनिषदांत एकंदर ९४ लोक असून, त्यांपैकी श्लोक ३५ ते ४९ अखेर- पर्यंत सीताहरणानंतरची रामाची ऐतिहासिक हकीकत आहे. हे श्लोक इतिहासज्ञांस अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणून येथे देऊन ठेवितों. रामपूर्वतापनीयांतील ऐतिहासिक भाग. स्तुवंत्येवं हि ऋषेयः; तदा रावण आसुरः । रामपत्नीं वनस्थां यः स्वनिर्वृत्यर्थमाददे ॥ ३५ ॥ 6 4 जानकीदेहभूपाय रक्षोन्नाय शुभांगिने | भद्राय रघुवीराय दशास्यांतकरू- पिणे ॥ पू. ता. ३२ ॥ २ याप्रमाणे रामाची ऋषि स्तुति करितात. ( परब्रह्म वगैरे म्हणून ).