पान:रामायणनिरीक्षण.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट ४ थें. ( २ ) राम म्हणजे परब्रह्म अशी समज होती:- इति रामपदेनासौ परं ब्रह्माभिधीयते ॥ - विना यंत्रेण चेत् पूजा देवता न प्रसीदति । रापू. श्लो. ६. ( ३ ) रामाची किंवा कोणत्याहि देवतेची यंत्र लिहून पूजा केल्याखेरीज ती सिद्धीस जात नाहीं अशी समजूत होती. यंत्र लिहिलें म्हणजे त्या देवतेबरोबर इतर मंडळीहि येतेच. १४७ रा. पू. श्लो. १३. ( ४ ) रामाच्या ठाईं हें सर्व विश्व असून सीता व राम, प्रकृति व पुरुषरूप होत अशी समज झाली होती. यथैव वटबीजस्थः प्राकृतश्च महाद्रुमः ॥ तथैव रामबीजस्थं जगदेतच्चराचरम् ॥ १६ ॥ सीतारामौ तन्मयावत्र पूज्यौ ।। १७ ।। ( ५ ) नुसता राम तेजानें वन्हीप्रमाणें व अनंत असून, प्रकृतीनें तो युक्त असला म्हणजे सौम्य असतो अशी समजूत होती:- अत्र रामोऽनंतरूपस्तेजसा वन्हिना समः ॥ २३ ॥ प्रकृत्या सहितः श्यामः पीतवासा जटाधरः | द्विभुजी कुंडली रत्नमाली धीरो धनुर्धरः ॥ २५ ॥ ( ६ ) रामास पू. ता. श्लोक २७ मध्यें असें ह्मटलें आहे; वर तो रघुकुलांतील असून असल्याविषयीं वर्णन आलेच आहे. + ( ७ ) श्लोक २८ ( पू. ता. ) त लक्ष्मणाचा, श्लोक ३२ त १ म्हणजे ' प्रकृतिपुरुषमयौ ' २ हे मनुष्यरूपी रामाचं वर्णन आहे. -- कोशलजात्मज, 'दशरथा' चा पुत्र