पान:रामायणनिरीक्षण.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रामायणनिरीक्षण. रामा- रावण महिरावणांविषयीं इत्यादिकांविषयीं हल्लीं जे लोकांत प्रचलित विचार आहेत ते सर्व या रामायणांत आढळून येत असल्यामुळे ते या रामायणावरूनच उद्भवले असल्याचा संभव आहे. बहुधा कालिदासास हैं रामायण ठाऊक असण्याचा संभव आहे. तेव्हां, हें यण त्याच्या पूर्वीचेंहि असण्याचा संभव आहे; शिवाय, हें रामा- यण वा. रा. ला जें सद्य: स्वरूप मिळाले आहे. त्याहूनहि प्राचीनतर दिसतें; कारण, उत्तरकांडांत ( मेलेल्या ) मुलाचें वय यांत ५ पांच वर्षांचेंच दिले असून वा. रा. प्रमाणें ५००० वर्षीचें दिलेले नाहीं !!