पान:रामायणनिरीक्षण.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ रामायणनिरीक्षण. नेलें. कुशानें युद्ध करून उग्रबाहु व त्याचा पुत्र चित्रांगद या दोघां- सहि पकडून रामाजवळ आणिलें. ( ३० ) पूर्णकांडांत सोमवंशीय राजाचें व रामादिकांचें हस्तिना पुरीं युद्ध झाल्याचा उल्लेख आहे. सोमवंशापैकीं सोम-बुध - पुरूरवा- गव्य-अल्प–नल-नधुक - जातीकर - वसुद - लघुश्रुत - सुरथ - अजमीढ याप्रमाणें रामाच्या वेळेची ( वेळेपर्यंतची ) मंडळी या रामायणांत आ- ढळते. पुढें हस्तिनापुराकरितां सूर्यवंशीय व सोमवंशीय राजे यांच्यांत युद्ध होऊन ब्रम्हदेवांदिकांच्या मध्यस्थीनें तें शेवटीं थांबून समेट झाला. श्रीराम निजधामास जातेवेळी त्यांनीं सोमवंशापैकीं अजमी- ढास हस्तिनापुरीं अभिषिक्त केलें. ( ९-६ ). ( ३१ ) पुढें राम फाल्गुन कृष्ण पंचमीस पौरजानपदांसह वा बंधूंबरोबर निजधामास गेले. वसंतपंचमी चास्ति तिथिश्चैत्रासिताऽद्य हि । पुण्ये हि स्वपदे गंतुं त्वरां कुरु रमेश्वर ॥ ४६ ॥ . आ. रा. ९-६-४६ ‘चैत्रासिता – हुताशन्यनंतरं पूर्णिमांतमानेन प्राप्ता फाल्गुनकृष्णपंचमी रंगपंचमीसंज्ञाऽवगंतव्या ' अशी यावर टीप आहे. ( ३२ ) अजमीढानें रामाच्या वैकुंठारोहणाची हकीकत कुशास सांगून त्याचें सांत्वन केलें. पुढें कुशास कुमुद्रती नामक सर्पकन्या मिळून तिचे ठाई त्यास अतिथि वगैरे पुत्र झाले. २- (३३ कुशापासून पुढील सूर्यवंश (९-७ मध्यें ) याप्रकारें दिलेला आहे. कुश - अतिथि --- निषध --नभ - पुंडरीक क्षेमधन्वा -- देवानीक - अहीन- पारियात्र( पार्यात्र ) वन-स्थल - - वज्रनाभ - खगण --विधृति--हिरण्यनाभ-- पुष्य ( पुप्प ) - धुवसंधि ( पौप्य ) - सुदर्शन-- अग्निवर्ण-शीघ्र - मरु